नवी दिल्ली : मायक्रोमॅक्स या भारतीय मोबाईल कंपनीने आज भारतात आपला नवा Canvas Infinity हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची खासियत सांगायची तर या स्मार्टफोनचा स्क्रीन रेशीओ १८.९ इतका आहे.
हायर स्क्रीन रेशीओ एज टू एज स्क्रीनसोबत दिला जातो. LG G6 आणि सॅमसंग गॅलक्सी S8 मध्येही असेच बघायला मिळते. मात्र, भारतीय बाजारपेठेत आधीपासूनच उपलब्ध असलेल्या काही स्मार्टफोनसोबत Canvas Infinity ला स्पर्धा करावी लागेल. बाजारात Canvas Infinity या स्मार्टफोनला LG Q6, Redmi Note 4, Honor 6X आणि Lenovo K8 Note स्मार्टफोनकडून जोरदार टक्कर मिळेल.
मायक्रोमॅक्स Canvas Infinity ची किंमत ९ हजार ९९९ रूपये इतकी आहे आणि हा स्मार्टफोन एकाच स्टोरेज मॉडेलमध्ये सादर करण्यात आलाय. तसेच दुसरीकडे LG Q6 स्मार्टफोन आहे, ज्याची किंमत १४ हजार ९९० रूपये आहे. त्याव्यतिरीक्त शाओमी Redmi Note 4 बद्दल सांगायचं तर हा हॅंडसेट तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. याच्या 2GB रॅम + 32GB स्टोरेज फोनची किंमत ९ हजार ९९९ रूपये, 3GB रॅम + 32GB स्टोरेज फोनची किंमत १० हजार ९९९ रूपये आणि 4GB रॅम + 64GB स्टोरेज फोनची किंमत १२ हजार ९९९ रूपये इतकी आहे.
यासोबतच Honor 6X च्या 32GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १० हजार ९९९ रूपये आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १२ हजार ९९९ रूपये आहे. तसेच Lenovo K8 Note बद्दल सांगायचं तर याचेही दोन व्हेरिएंट आहेत. याच्या 3GB रॅम + 32GB स्टोरेज स्मार्टफोनची किंमत १२ हजार ९९९ रूपये आहे. तर 4GB रॅम + 64GB फोनची किंमत १३ हजार ९९९ रूपये आहे.
Canvas Infinity सोडून बाकी सर्व स्मार्टफोन्समध्ये ५.५ इंचाचा डिस्प्ले देण्यात आलाय. तेच Canvas Infinity मध्ये ५.७ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले १८.९ स्क्रीन रेशीओसोबत देण्यात आलंय. या स्मार्टफोनच्या स्पेशिफिकेशनबद्दल सांगायचं तर Canvas Infinity स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४२५ SoC सोबत 3GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज दिलं आहे. मायक्रो एसडी कार्ड ने स्टोरेज 128GB पर्यंत वाढवता येतं.
Canvas Infinity मध्ये १३ मेगापिक्स्ल रिअर कॅमेरा एलईडी फ्लॅशसोबत देण्यात आलाय. यासोबतच फ्रंट कॅमेरा १६ मेगापिक्सलचा देण्यात आलाय. ज्यात फ्लॅशसोबत रिअल टाईम Bokeh, फेस ब्यूटी मोड, ऑटो सीन डिटेक्शन आणि सुपर पिक्सलसारखे ऑप्शन देण्यात आले आहेत.
LG Q6 आणि Redmi Note 4 मध्ये १३ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा देण्यात आलाय. मात्र, फ्रंट कॅमेरा केवळ ५ मेगापिक्सलचा देण्यात आलाय. तेच Honor 6X मध्ये K8 Note सारखा ड्युअल रिअर कॅमेरा देण्यात आलाय. Honor 6X मध्ये १२ मेगापिक्सल + २ मेगापिक्सल रिअर कॅमेरा एलईडी फ्लॅशसोबत बॅक पॅनलवर देण्यात आलाय. तर K8 Note मध्ये १३ मेगापिक्सल + ५ मेगापिक्सल ड्युअल रिअर कॅमेरा ड्युअल एलईडी फ्लॅशसोबत देण्यात आलाय. तसेच Honor 6X मध्ये ८ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आणि K8 Note मध्ये १३ मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आलाय.
Canvas Infinity मध्ये पॉवर बॅकअपसाठी 2,900mAh बॅटरी देण्यात आली आहे. तेच इतरही स्मार्टफोनमध्ये 3,000mAh पेक्षा जास्त बॅटरी देण्यात आली आहे. LG Q6 मध्ये 3,000mAh बॅटरी दिली आहे. तर Redmi Note 4 मध्ये 4,100mAh बॅटरी, Honor 6X मध्ये 3,340mAh बॅटरी देण्यात आलीये. आणि K8 फास्ट चार्जिंगसोबत 4,000mAh बॅटरी देण्यात आली आहे.
सॉफ्टवेअर बाबत बोलायचं तर Canvas Infinity, LG Q6 आणि Lenovo K8 Note अॅन्ड्रॉईड नॉगटवर काम करतात. तर दुसरे स्मार्टफोन अॅन्ड्रॉईड ६.० मार्शमॅलोवर काम करतात. Redmi Note 4 त्यांच्या स्वत:च्या MIUI 8 इंटरफेस आणि Honor 6X Emotion UI सोबत मिळतात. सर्वच स्मार्टफोन ड्युअल सिम, 4G वीओएलटीआय, ब्लूटूथ आणि वाय-फायसारख्या पर्यायांच्या सपोर्टसोबत उपलब्ध आहेत.