सावधान...मोबाईलमुळे संवाद हरवल्यानं डिवोर्सचं प्रमाण वाढलंय

मोबाईलमुळं आता संसार तुटू लागलेत. मोबाईलचा अतिवापरच घात करतो. नवरा बायकोतला संवाद संपलाय. संवाद संपल्यानं डिवोर्सचं प्रमाण वाढलंय

Updated: Dec 13, 2019, 12:05 AM IST
सावधान...मोबाईलमुळे संवाद हरवल्यानं डिवोर्सचं प्रमाण वाढलंय

कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे : मोबाईलमुळं आता संसार तुटू लागलेत. मोबाईलचा अतिवापरच घात करतो. नवरा बायकोतला संवाद संपलाय. संवाद संपल्यानं डिवोर्सचं प्रमाण वाढलंय. ही गोष्ट फक्त शहराचीच नाही तर ग्रामीण भागात ही असंच घडतोय. त्यामुळं आता संसार टिकवायचा असेल तर मोबाईल बाजूला ठेवा असा सल्ला मानसोपचारज्ज्ञ देतायत. 

लोकल, बस आणि गर्दीतही... जिथे पाहावं तिथं माना खाली घालून लोक तासंतास मोबाईलवर असतात. बाहेर असतो तेव्हा हे ठीक आहे. घरात ही हिच स्थिती. मोबाईलच्या अतिवापराने आता संबंधावर परिणाम होऊ लागलाय. 

खास करुन नव दाम्पत्यांच्या संसारात. लग्न झाल्यानंतर एक किंवा दोन वर्षांमध्ये डिवोर्स घेणाऱ्याचं प्रमाण २० टक्क्यांनी वाढलंय. आणि बहुतांश केसेस मध्ये मोबाईलच मुख्य कारण असल्याचं आता लक्षात येतंय. 

पर्सनल लाईफ हा विषय राहिलेला नाही. आपण सर्वांनी स्वत:चं असं स्वतंत्र डिजिटल जग तयार केलंय. अगोदर टीव्ही हे कारण असायचं. आता ती जागा मोबाईलनं घेतलीय. 

बायको व्हॉटस्अपवर असते आणि नवरा फेसबुकवर. दोघांचा संवादच होत नाही. एकंमेकांमध्ये संवाद आणि संपर्कच तुटलाय. त्यामुळं डिवोर्सचं प्रमाण वाढत जातंय असं मानायला हरकत नाही. 

पती-पत्नीचं नातं पाहता दोघांमध्ये विश्वास आणि आत्मीयता हा मोठा भाग आहे. एकमेकांबद्दल अफेक्शन असणं ही गरजेचं असते. हे सर्व तेव्हाच होतं जेव्हा दोघं एकमेकांशी बोलतात. एकमेकांना वेळ देतात. आजच्या न्युक्लियर कुटुंब पध्दतीत आणि ग्लोबलायजेशनच्या फेऱ्यात हा संवादच हरवला गेला आहे.

इंग्लिशमध्ये असं म्हटलं जातं की Greated gift you can give someone is your presence. उपस्थितीती एकमेकांची एकमेकांना दिली पाहिजे. शातंपण बसून बोललो पाहिजे. 

एकमेकांना वेळ दिला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण आपल्या मनाला मॅनेज करायला शिकलं पाहिजे. टेक्नोलॉजी वाईट नाही पण ती आपण कशी वापरतो याचा आपला दृष्टीकोन चुकीचा आहे. असं मला वाटतं. 

आपला संसार वाचवायचा असेल तर मोबाईल बाजूला ठेवा एकमेकांना वेळ द्या. कहते सुनते, बातो ही बातो में प्यार हो जाएगा असं असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.