Tech News : भारतीय बाजारपेठेत फ्लॅगशिप Edge 30 सीरिजनुसार Motorola कंपनी नवा स्मार्टफोन लाँच करणार आहे. नव्या स्मार्टफोनची लाँच डेट आणि प्रोडक्ट संदर्भात माहिती अद्याप समोर आलेली नाही. असं असलं तरी, टिप्सटरने दिलेल्या माहितीनुसार, Edge 30 सीरीज अंतर्गत Motorola कंपनी एक नवा स्मार्टफोन लाँच करणार आहे ज्याचं नाव Motorola Edge 30 Ultra आहे. 200MP चा कॅमेरा असणारा हा भारतातला पहिलाचं स्मार्टफोन असणार आहे.
टिप्सटरकडून ट्विटरच्या माध्यमातून Motorola Edge 30 Ultra या स्मार्टफोनबद्दल माहिती देताना सांगण्यात आलंय की, हा देशातला पहिलाच स्मार्टफोन असेल ज्याचा कॅमेरा 200MP आहे. त्याचबरोबर, हा स्मार्टफोन 8 सप्टेंबरला लाँच होईल असंही तिथं सांगण्यात आलं.
Motorola Edge 30 Ultra will be 1st Indian smartphone to feature 200MP camera launching on 8 September, 2022.
- 200MP rear camera #Moto #Motorola #MotorolaEdge30Ultra pic.twitter.com/zd7VjGrPVU— Abhishek Yadav (@yabhishekhd) August 22, 2022
Motorola कंपनीने अद्याप या स्मार्टफोनची कोणतीही माहिती जाहीर केली नाही. Edge 30 सीरीज अंतर्गत लाँच केला जाणारा हा स्मार्टफोन केव्हा लाँच केला जाईल या कंपनीकडून याबद्दल कोणतीही डेट ऑफिशिअल रिवील केली नाही.
@mountainmowgli is one of India's top climbers, and is not afraid to challenge the status quo. Learn more about him as we partner with him in the never seen before journey to #FindYourEdge exclusively on #TheNextEdge. https://t.co/ceZRvAInuE pic.twitter.com/jLwBHvxk6O
— Motorola India (@motorolaindia) August 22, 2022
Motorola India च्या ऑफिशिअल ट्विटरद्वारे काही दिवसांआधी एक व्हिडिओ शेअर करुन टीजर व्हिडिओमध्ये कन्फर्म सांगितलं आहे की, या स्मार्टफोनचा कॅमेरा 200MP असणार आहे.
लीक झालेल्या माहितीनुसार, या स्मार्टफोनला 6.6 इंचांचा फ्लॅट डिस्प्ले असणार आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 144Hz असेल. Motorola च्या या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप दिलं जाणार आहे, ज्याचा प्रायमरी कॅमेरा 200MP असेल तर 50MP अल्ट्रा-वाइड सेंसर आणि 12MP टेलीफोटो सेंसर असणार आहे.
हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरपेक्षा कमी असेल. तसेच, या फोनची बॅटरी 4,500mAh असणार आहे, जी 125W फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्ट देणारी असेल.