मुंबई : मोटोरोला (Motorola)ने नुकताच आकर्षक 5G स्मार्टफोन लॉंच केला आहे. तो म्हणजेच Motorola Edge 30 होय. स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रगन 778G+चिपसेट आणि 144 Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले आहे. Motorola Edge 30 मध्ये 6.5-इंचाचा डिस्प्ले, एक शक्तिशाली 4,020 mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा आहे. पण या स्मार्टफोनची किंमत किती आणि फीचर्स काय ते जाणून घेऊ...
मोटोरोला एड्ज 30 ची 8 GB+ 128 GB वेरिएंटची सुरूवात 449.99 युरो (36297 रुपये) आहे. हा स्मार्टफोन 3 रंगात उपलब्ध आहे. ऑरोरा ग्रीन, मेटियोर ग्रे आण सुपरमून सिल्वरमध्ये उपलब्ध असणार आहे. स्मार्टफोन लवकरच युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, भारत, लॅटिन अमेरिकेच्या बाजारात लॉंच केले जाणार आहे.
डिव्हाइसमध्ये गोल कॅमेरा आहे. जो किंचित मागच्या बाजूने बाहेर येतो. डिव्हाइसच्या बाजू किंचित वक्र आहेत आणि उजव्या बाजूला पॉवर बटण आणि व्हॉल्यूम रॉकर आहे. मोटोरोलाने दावा केला आहे की, हा आतापर्यंतचा सर्वात पातळ 5G फोन आहे. ज्याची जाडी फक्त 6.79mm आहे (कॅमेरा वगळता).
डिव्हाइसवरील इतर वैशिष्ट्यांमध्ये ड्युअल-सिम 5G (सब-6 GHz), Wi-Fi 6E, ब्लूटूथ 5.2, NFC आणि USB-C पोर्ट समाविष्ट आहे. डिव्हाइसमध्ये 3.5mm हेडफोन जॅक नाही आणि IP52 डस्ट आणि स्प्लॅश रेझिस्टन्स रेटिंगसह येतो. संगीतासाठी, Edge 30 मध्ये Dolby Atmos सह स्टिरीओ स्पीकर आहेत.
Motorola Edge 30 मध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यात OIS आणि ऑल-पिक्सेल फोकससह 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. Edge 30 मध्ये 118° FOV असलेल्या अल्ट्रा-वाइड कॅमेर्यासाठी 50 मेगापिक्सल सेन्सर आहे. जो मॅक्रो कॅमेरा म्हणून देखील वापरला जाऊ शकतो. तिसरा कॅमेरा 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आहे. आम्हाला सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 32MP सेल्फी कॅमेरा मिळतो.
डिव्हाइस Android 12 आधारित My UX आउट-ऑफ-द-बॉक्सद्वारे संचलित असेल. स्मार्टफोनला 33W जलद चार्जिंगसह (बॉक्समध्ये टर्बो पॉवर चार्जर) 4,020 mAh ची बॅटरी उपलब्ध आहे.