Motorola च्या फोल्डबल स्मार्टफोनमुळे सॅमसंगचं टेन्शन वाढणार! उद्या होणार लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

सॅमसंगचा फोल्डेबल स्मार्टफोन लाँच होण्यापूर्वी मोटोरोला धक्का देण्याच्या तयारीत आहे. 

Updated: Aug 1, 2022, 01:59 PM IST
Motorola च्या फोल्डबल स्मार्टफोनमुळे सॅमसंगचं टेन्शन वाढणार! उद्या होणार लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स title=

Moto Razr 2022: सॅमसंगचा फोल्डेबल स्मार्टफोन लाँच होण्यापूर्वी मोटोरोला धक्का देण्याच्या तयारीत आहे. सॅमसंगचा Galaxy Flip 4 आणि Fold 4 हा स्मार्टफोन लाँच होण्याच्या एक आठवडा अगोदर मोटोरोला आपला फोल्डेबल फोन लाँच करणार आहे. मोटोरोलाने 2019 मध्ये Moto Razr या स्मार्टफोनसह फोल्डेबल विभागात प्रवेश केला होता. त्यानंतर कंपनीने Moto Razr 2020 लाँच केला. हा स्मार्टफोन पहिल्या-जनरल स्मार्टफोनची सुधारित आवृत्ती होती. काही कारणास्तव मोटोरोलाने 2021 मध्ये Razr स्मार्टफोन लाँच केला नाही. आता मोटोरोला या वर्षी नवीन Moto Razr 2022 लाँच करणार आहे. 2 ऑगस्टला म्हणजेच उद्या मोटोरोला Moto X30 Pro सोबत Moto Razr 2022 लाँच करेल. लाँचिंग कार्यक्रम संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. याचं लाइव्ह स्ट्रीम तुम्ही आरामात घरच्या घरी पाहू शकता. हा स्मार्टफोन सध्या चीनमध्ये लाँच होणार असून लवकरच त्याचे आंतरराष्ट्रीय पदार्पण होणार आहे.

लीक्स आणि मोटोरोलाच्या प्रमोशन व्हिडीओनुसार, नवीन Razr 2022 पूर्णपणे नवीन लुकसह येईल. यात बॉक्सियर, स्क्वेअर-ऑफ डिझाइन असेल आणि मागील मॉडेलपेक्षा वेगळा असेल. फोनच्या डिस्प्लेमध्ये सेल्फी कॅमेर्‍यासाठी सेंट्रेड होल पंच असेल. डिव्हाइसमध्ये 6.7-इंचाचा फोल्डेबल AMOLED डिस्प्ले असेल जो पूर्ण HD+ रिझोल्यूशन आणि 20:9 आस्पेक्ट रेशो ऑफर करेल. डिव्हाइसमध्ये 120Hz रिफ्रेश दर असल्याचीही अफवा आहे.

डिव्हाइसमध्ये 3500mAh ड्युअल-सेल बॅटरी असेल. डिव्हाइसची चार्जिंग स्पीड अद्याप स्पष्ट नाही. परंतु जलद-चार्जिंग समर्थनासह येईल, अशी अपेक्षा आहे. यापूर्वी आलेल्या Moto Razr 2020 चा कॅमेऱ्याने मोबाईलप्रेमींची निराशा केली होती. पण Moto Razr 2022 मध्ये उत्तम कॅमेरा मिळणार आहे. रिपोर्टवर विश्वास ठेवला तर, डिव्हाइसमध्ये 13-मेगापिक्सेल अल्ट्रावाइड लेन्ससह f/1.8 अपर्चरसह 50-मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर असेल. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी 32-मेगापिक्सेल शूटर असू शकतो. Moto Razr 2020 पेक्षा  Moto Razr 2022 हा स्मार्टफोन स्वस्त असेल, असं सांगण्यात येत आहे. या स्मार्टफोनची किंमत रु. 94,996 असण्याची शक्यता आहे.