आशियातील सर्वाधित श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी दुसऱ्या स्थानावर

रिलायंस इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत. अंबानी यांची मागील वर्षाची संपत्ती जवळपास 12.1 बिलियन डॉलर इतकी आहे.

Updated: Aug 1, 2017, 03:10 PM IST
आशियातील सर्वाधित श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी दुसऱ्या स्थानावर title=

नवी दिल्ली : रिलायंस इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत. अंबानी यांची मागील वर्षाची संपत्ती जवळपास 12.1 बिलियन डॉलर इतकी आहे.

अंबानी यांनी जिओ लॉन्च केल्यानंतर हे स्थान मिळवलं आहे. आशियाच्या सर्वात श्रीमंतांच्या यादीत हाँगकाँगचे उद्योगपती ली का शिंग हे आहेत.

ब्लूमबर्गने जारी केलेल्या आशियातील बिलिनियर इंडेक्सनुसार, टेलिकॉम कंपनी रिलायंसच्या शेअरमध्ये वाढ झाली आहे. पुन्हा १५०० रुपयाचा फोन लॉन्च केल्यामुळे जिओचा बेस आणखी वाढणार आहे.

जिओमुळे कंपनी मार्केटपण 15 वर्षांच्या उच्च स्तरावर पोहोचला. आतापर्यंत मुकेश अंबानींनी जिओमध्ये 31 बिलियन डॉलर गुतंवणूक केले आहे. पण कंपनीला 90 चक्के कमाई पेट्रोकेमिकल, रिफाइनिंग मधून होते. याशिवाय रिटेल, मीडिया आणि नॅचरल गॅस उत्खननमधून देखील कंपनीला कमाई होते.

कंपनीसाठी जिओ एक सोन्याचं अंड देणारी कोंबडी ठरणार आहे. पुढच्या १० वर्षात ते खूप मोठ्या प्रमाणात वाढतील. आणि टेलिकॉम क्षेत्रात राज्य करतील.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x