Netflix Cheapest Plan: नेटफ्लिक्स धारकांसाठी मोठी बातमी, सर्वांत स्वस्त प्लॅनची घोषणा

खरंच इतक स्वस्त मिळतंय नेटफ्लिक्सचं सब्सक्रिप्शन, जाणून घ्या एका क्लिकवर 

Updated: Oct 14, 2022, 05:12 PM IST
 Netflix Cheapest Plan: नेटफ्लिक्स धारकांसाठी मोठी बातमी, सर्वांत स्वस्त प्लॅनची घोषणा title=

मुंबई : नेटफ्लिक्स धारकांसाठी आणि नवीन सबस्क्रिप्शन घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी सर्वांत मोठी बातमी समोर आली आहे. नेटफ्लिक्सने आता सर्वांत स्वस्त प्लान आणला आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नेमक या नवीन प्लॅनमध्ये काय ऑफर देण्यात आली आहे, हे जाणून घेऊय़ात. 

Netflix ने आपला सर्वात स्वस्त सबस्क्रिप्शन प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना जाहिरातीसह नेटफ्लिक्सची सुविधा मिळणार आहे. म्हणजेच युजर्सना या प्लॅनमध्ये जाहिराती पहाव्या लागतील. नेटफ्लिक्सच्या प्लॅनची​या वर्षाच्या सुरुवातीपासूनच चर्चा होत होती. अखेर तो प्लॅन Netflix घेऊन आलीच आहे. 

Netflix चा हा प्लॅन सध्या युजर्ससाठी उपलब्ध नाही. हा नवीन प्लॅन नोव्हेंबरमध्ये उपलब्ध होईल. मात्र, कंपनीने त्याची किंमत आणि फीचर्स जाहीर केले आहेत. ज्यांना कमी खर्चात नेटफ्लिक्सचे सदस्यत्व घ्यायचे आहे त्यांच्यासाठी हा प्लॅन खुप चांगला असणार आहे. 

प्लॅनची किंमत किती? 
नवीन प्लॅनची किंमत $ 6.99 (सुमारे 575 रुपये) आहे. भारतात या किमतीत तुम्हाला नेटफ्लिक्स प्रीमियम प्लॅन मिळेल. येथे प्रीमियम प्लॅनची किंमत 649 रुपये आहे. कंपनीने अॅड सपोर्ट असलेल्या प्लॅनला बेसिक विथ अॅड्स असे नाव दिले आहे. हा प्लॅन 3 नोव्हेंबरपासून यूएस वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असेल. या प्लॅनचा फायदा अमेरिकेशिवाय ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, कोरिया, मेक्सिको, स्पेन आणि यूकेच्या वापरकर्त्यांना मिळणार आहे.

दरम्यान भारतात Netflix प्लॅन्स 149 रुपयांपासून सुरू होतात, ज्यामध्ये वापरकर्त्यांना जाहिरातमुक्त अनुभव मिळतो. तर यूएस मध्ये याची किंमत $9.99 (सुमारे 800 रुपये) पासून सुरू होते. ही किंमत एका महिन्याच्या सबस्क्रिप्शनसाठी आहे. त्यामुळे इतर देशांच्या तुलनेत भारतात प्लॅनची किंमत कमी आहे.