5G Service: भारतात 5जी सेवा सुरू झाली असून मोबाईप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. यामुळे इंटरनेट जग आणखी जलद होणार आहे. 5G सेवेची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहात आहे. कारण हायस्पीड इंटरनेट ही आजची गरज बनली आहे. या सेवेमुळे कॉलिंग, व्हिडीओ बघणं पूर्वीपेक्षा चांगलं असेल. त्याचबरोबर डाउनलोड स्पीड देखील चांगला असेल. दूरसंचार कंपन्या 5G सेवा काही शहरांमध्ये सुरु करत आहेत. भारतात 5G सेवा सुरू झाली असून हळूहळू प्रत्येक भारतीयाला ही सेवा मिळू लागेल. 5G सेवा सुरु झाल्यानंतर युजर्सना काही फायदे मिळणार आहेत? चला जाणून घेऊयात.
1. 5G सेवा पूर्णपणे लागू होताच, तुम्हाला हाय स्पीड इंटरनेटचा अनुभव मिळू लागेल. कारण हाय स्पीड इंटरनेट ही आज लोकांची गरज बनली आहे.
2. 5G सेवेमुळे कॉलिंग पूर्वीपेक्षा चांगलं असेल आणि कोणताही व्यत्यय येणार नाही. 4G नेटवर्कमध्ये कॉल करताना समस्या असायची. परंतु 5G सह अशी कोणतीही समस्या उद्भवणार नाही.
3. 5G सेवेमुळे तुम्हाला हाय स्पीड इंटरनेट मिळेल, इतकेच नाही तर तुम्हाला एक मजबूत डाउनलोडिंग स्पीड देखील मिळेल. 5G इंटरनेटमुळे वापरकर्ते हेवी फाइल्स जलद डाउनलोड करू शकतील.
4. 4G नेटवर्कमध्ये कॉल ड्रॉपची समस्या सामान्य आहे आणि अनेक वर्षांपासून वापरकर्त्यांना याचा त्रास होत आहे. 5G नेटवर्क आल्यानंतर आता युजर्सची या समस्येपासून सुटका होणार आहे
5. 4G सेवेची एक मोठी समस्या अशी होती की, बर्याच भागात नेटवर्क नसायचं आणि काही भागात चांगले असायचं. परंतु 5G सेवा आल्यानंतर तुम्हाला सर्वत्र नेटवर्कचे सर्वोत्तम कव्हरेज मिळेल.