'या' डिवाइसमुळे 100% वाढेल तुमच्या स्मार्टफोनच्या बॅटरीची लाईफ

असा होईल फायदा 

'या' डिवाइसमुळे 100% वाढेल तुमच्या स्मार्टफोनच्या बॅटरीची लाईफ  title=

मुंबई : भारतीय मूळ असलेल्या वैज्ञानिकाच्या नेतृत्वात एका टीमने नवं उपकरण विकसित केलं आहे. ज्या उपकरणामुळे लॅपटॉप आणि स्मार्टफोनच्या बॅटरीचं आयुष्य 100 टक्क्यांनी वाढणार आहे. अमेरिकेतील मिसौरी युनिर्व्हसिटीच्या शोधकर्त्यांमध्ये एक अस चुंबकीय उपकरण विकसित केलं आहे. जे काही खास उपकरणांचे विशिष्ट इलेक्ट्रॉनिक गुण प्रदर्शित केले आहेत. 

या विद्यापीठाचे सहाय्यक प्रोफेसर दीपक के सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, सेमिकंडक्टर डायोड आणि एम्पलीफायर हे कायम सिलिकॉन आणि जर्मेनियमवरून बनवलेला असतो. आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणात महत्वाचे तत्व आहेत. त्यांनी सांगितलं की, त्यांच्या टीमने सिलिकॉन जमा करून द्वि - आयामी नॅनोस्ट्रक्टर सामग्री विकसित केलं आहे. 

युनिडायरेक्सनल नावाच्या या प्रणालीत एकाच दिशेला विद्युत प्रवाह दिला जाणार आहे. यातील मॅग्नेटिक डायोड ट्राजिस्टर आणि एम्पलीफायरमध्ये विद्युत शक्ती वाढवण्यात आली आहे. या डिवाइसची सर्वात महत्वाची बाब आहे की, यामुळे 5 तासाचे चार्ज हे 500 तासाचे चार्ज करण्याची क्षमता असणार आहे