तुमच्या खिशाला परवडेल अशा Mahindra Scorpio Classic चा व्हिडिओ, आताच पैसे बाजूला ठेवा

नवीन अवतार येणाऱ्या Scorpio Classic उद्या लॉंच करण्यात येणार आहे. या कारची लाँचिंग होण्याआधीच एका व्हिडिओच्या माध्यमातून या कारचं कारचं एक्सटीरिअर आणि इंटेरिअर लीक झालं आहे. 

Updated: Aug 11, 2022, 04:07 PM IST
तुमच्या खिशाला परवडेल अशा Mahindra Scorpio Classic चा व्हिडिओ, आताच पैसे बाजूला ठेवा title=

Mahindra Scorpio Classic Price : महेंद्रा कंपनीने जुन्या स्कॉर्पिओला नव्या अंदाजात पुन्हा लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन अवतार येणाऱ्या स्कॉर्पिओचं नाव Scorpio Classic आहे. उद्या (12 ऑगस्ट) या कारला लॉंच करण्यात येणार आहे. या कारची लाँचिंग होण्याआधीच एका व्हिडिओच्या माध्यमातून या कारचं कारचं एक्सटीरिअर आणि इंटेरिअर लीक झालं आहे. 

असा असणार SUVचा नवीन अंदाज

Yash9w नावाच्या एका यूट्यूब चॅनलने या कारचा व्हिडिओ अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये एसयूव्हीचा बेस व्हेरिअंट दाखवण्यात आला आहे. या नव्या स्कॉर्पिओ क्लासिकमध्ये अनेक असे फीचर्स असणार आहेत जे याआधीच्या स्कॉर्पिओमध्ये नव्हते. असं असलं तरी, बऱ्याच प्रमाणात नवीन स्कॉर्पिओ ही जून्या मॉडेलसारखीच दिसते आहे. या कारचा फ्रंटलूक नव्या स्कॉर्पिओ एन ची आठवण करुन देतो. यामध्ये लेटेस्ट ग्रिल आणि महिंद्रा कंपनीचा नवीन लोगो असणार आहे. एअर डॅम आणि फ्रंट बंपरला अपडेट केलं आहे. एसयूव्हीमध्ये अलॉय व्हिल्स देखील असणार आहेत. प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, रुफ रेल्स, वर्टिकली LED टेललॅंप्स आणि फ्लॅट टेलगेट दिलं जाणार आहे.

Scorpio Classic चं इंजिन

स्कॉर्पिओ क्लासिकचं इंजिन हे 2.2 लिटर डिझेल बसेल इतकं आहे. हे इंजिन दोन प्रकारांत उपलब्ध असणार आहे. बेल-स्पेक व्हेरियंटमध्ये 120 hp ची मॅक्झिमम पावर आणि 280 Nm चं पीक टॉर्क असेल, तर टॉप व्हेरियंट 140 एचपी आणि 319 एनएम जनरेट करेल. स्कॉर्पिओ क्लासिकला केवळ मॅन्यू्अल ट्रान्समिशनसोबत लाँच केलं जाणार आहे.

Scorpio Classic ची किंमत

सध्याचं मॉडेल हे 5 ट्रिम्समध्ये उपलब्ध आहे. पण नव्या स्कॉर्पिओ क्सासिकला केवळ दोनच ट्रिम्स असू शकतात. यामध्ये बेस-स्पेक S ट्रिम आणि टॉप-स्पेक S11 ट्रिम असेल. या कारचं बेस व्हेरियंट कमर्शिअल वापराच्या दृष्टिकोनातून तयार केलं आहे. तर, टॉप व्हेरियंट खाजगी वापरासाठी योग्य ठरु शकेल. कारण, स्कॉर्पिओ क्सासिक 7-सीट आणि 9-सीट अशा व्हेरियंटमध्ये उपलब्ध होणार आहे. नव्या स्कर्पिओ क्लासिकच्या बेस व्हेरियंटची किंमत 10 लाख रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे.