पासवर्डची जागा घेणार नवे तंत्रज्ञान, चेहरा पाहून होणार अकाऊंट लॉगीन

 हे तंत्रज्ञान वापरण्यासाठी Google Chrome आणि Microsoft Edge काम करत आहे. येत्या काही काळात ही सेवा थेट युजर्सला वापरण्यात येणार असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. 

& Updated: Apr 12, 2018, 06:14 AM IST
पासवर्डची जागा घेणार नवे तंत्रज्ञान, चेहरा पाहून होणार अकाऊंट लॉगीन title=

मुंबई: तंत्रज्ञानाच्या स्मार्ट जगात नेहमीच बदल होत असतात. बदल हा सृष्टीचा नियम. हाच नियम तंत्रत्रानाच्या जगतातही लागू पडतो. त्यामुळे या बदलाची नोंद अधिक वेगाने घेण्यात तंत्रज्ञान नेहमीच अग्रेसर राहिले आहे. असेच नवे तंत्र वेबसाईट लॉगिन करताना आपल्याला वापरावे लागणार आहे. आता लवकरच वेबसाईटवर लॉगीन करण्यासाठी युजर्सला पासवर्ड टाकण्यासाठी किबोर्ड शोधण्याची गरज भासणार नाही. कारण या वेबसाईटवर युजर्स आयफोन्स प्रमाणे फेसआयडी ऑथेंटिकेशन वापरले जाणार आहे. Fido Alliance आणि W3C मार्फत लॉन्च करण्यात आलेल्या नव्या वेब ऑथेंटिकेशन स्टॅंडर्ड इन्क्रिप्टेड आहे. आणि हे पासवर्डसोबतच इतर सुरक्षाही देणार आहे. जे आपण फिंगरप्रिंट सेंसर, कॅमेरे आणि युएबी बटनाची जागा घेऊ शकते.

W3C websiteने म्हटले आहे की, हे स्पेसिफिकेशन, एपीआय क्षमतापूर्ण तंत्रज्ञान आहे. तसेच, अधिक ऑथेंटिकेटेड यूजर्ससाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहेत.  या तंत्रज्ञानाचा वापर करणारी पहिली टेक कंपनी Mozilla Firefox ही आहे. हे तंत्रज्ञान वापरण्यासाठी Google Chrome आणि Microsoft Edge काम करत आहे. येत्या काही काळात ही सेवा थेट युजर्सला वापरण्यात येणार असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. 

W3C websiteने पुढे म्हटले आहे की, जर एखादा युजर्स फोनवर वेबसाईटवर पहिल्यांदाच लॉगईन असेल तर, त्याच्या फोनवर 'register this device with example.com?  असा मेसेज येईल. या मेसेजला युजर्सने सकारात्मक प्रतिसाद दिल्यावर, ऑथरायजेशन जेस्चर (पिन, बायोमेट्रीक इ.) साठी विचारना होईल. एकदा का ऑथराइज़्ड लॉगिनची खात्री झाली की, 'Registration complete' स्क्रिनवर मेसेज दिसेन. त्यानंतर युजर्सला आपल्या अकाऊंटवर लॉगिन करता येईल.