Nissan Magnite Vs Renault Kiger: ऑटो क्षेत्रात अनेक कंपन्यांच्या एसयूव्ही कार उपलब्ध आहेत. मात्र स्वस्त आणि मस्त एसयूव्ही गाड्यांना ग्राहकांची पसंती असते. जर तुम्हालाही स्वस्तात मस्त एसयूव्ही कार घ्यायची असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. निसान मॅग्नाइटच आणि रेनॉ काइगर या दोन एसयूव्ही तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. लांबच्या प्रवासाठी या दोन्ही गाड्या उत्तम पर्याय आहेत. या दोन्ही पाच सीटर एसयूव्ही आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही गाड्यांची किंमत 6 लाखांच्या आत आहे. चला तर मग जाणून घेऊयात निसान मॅग्नाइट आणि रेनॉ काइगरचे स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि किंमत
Nissan Magnite SUV Price, Specifications & Features: निसान मॅग्नाइटमध्ये दोन पेट्रोल इंजिन पर्याय उपलब्ध आहेत. हे 1-लिटर नॅच्युरली एस्पिरेटेड इंजिन (72PS/96Nm) आणि दुसरं 1-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन (100PS/160Nm) सह येते. ग्राहक दोनपैकी कोणताही पर्याय निवडू शकतात. यात 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह सीव्हीटीचा पर्याय देखील उपलब्ध आहे. एसयूव्हीमध्ये 8-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले, 16-इंच ड्युअल-टोन अलॉय व्हील, एलईडी डीआरएलएस, एलईडी हेडलॅम्प आणि ऑटो एसी आहे. तसेच मागच्या बाजूस व्हेंटसह देखील दिलं आहे. यामध्ये वायरलेस फोन चार्जर, एअर प्युरिफायर, जेबीएल स्पीकर, अॅम्बियंट लाइटिंग, 360 डिग्री कॅमेरा आणि पुडल लॅम्प सारखी वैशिष्ट्ये दिली आहेत. निसान मॅग्नाइटची किंमत 5.97 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 10.79 लाख रुपयांपर्यंत जाते.
Renault Kiger SUV Price, Specifications & Features: रेनॉ काइगर या एसयूव्हीतही दोन इंजिन पर्याय आहेत. यात 1-लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन (72PS/96Nm) आणि 1-लिटर टर्बो-पेट्रोल (100PS/160Nm) इंजिन असे पर्याय आहेत. नॅचरली एस्पिरेटेड इंजिनला 5-स्पीड मॅन्युअल आणि एएमटीचा पर्याय मिळतो. त्याच वेळी, टर्बो-पेट्रोल इंजिनमध्ये सीव्हीटीचा पर्याय देखील उपलब्ध आहे. फीचर्सबाबत बोलायचं झालं तर, या एसयूव्हीत 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले, ऑटो क्लायमेट कंट्रोल, पुश-बटण स्टार्ट/स्टॉप यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. यात वायरलेस फोन चार्जिंग आणि क्रूझ कंट्रोलही आहे. रेनॉ काइगरची किंमत रु. 5.99 लाख ते रु. 10.62 लाख (एक्स-शोरूम) दरम्यान आहे.
दोन्ही गाड्यांच्या किमतीत थोडासा फरक आहे. हा फरक गाडी विकत घेताना ग्राहक विचारातही घेणार नाही. कारण जेव्हा तुम्ही लाखो रुपये खर्च करता तेव्हा दोन हजार रुपयांनी तितकासा फरक पडणार नाही. त्यामुळे तुम्ही फीचर्स आणि स्पेसिफेकशननुसार योग्य गाडी निवडू शकता.