WhatsApp video call : व्हॉट्स अॅप कॉलिंगसंदर्भात सर्वात मोठी Update; लगेच पाहा

कॉल करता येणार की नाही? लगेच पाहा 

Updated: Sep 27, 2022, 10:33 AM IST
WhatsApp video call : व्हॉट्स अॅप कॉलिंगसंदर्भात सर्वात मोठी Update; लगेच पाहा  title=
Now 32 people can use a same WhatsApp video call know how

WhatsApp video call : हल्लीच्या दिवसांमध्ये तुम्ही व्हॉट्स अप वापरता का? असा प्रश्न न विचारलेलाच बरा. कारण, सध्याच्या युगात जवळपास दर दुसऱ्या व्यक्तीच्या हातात स्मार्टफोन पाहायला मिळत आहे. यामध्ये असणाऱ्या असंख्य Apps पैकी एक म्हणजे व्हॉट्सअप (WhatsApp). 

मेसेजिंग, कॉलिंग, मनी ट्रान्सफर (Money transfer), फाईल आणि डेटा ट्रान्सफर अशा अनेक सुविधा या एका अॅपमधून पुरवल्या जातात. अशा या (App) अॅपमध्ये असणारं व्हिडीओ कॉलिंगचं फिचर सर्वाधिक वापरलं जातं. 

बाहेरगावी असणारी एखादी जवळची व्यक्ती असो, किंवा मग लगेचच कोणाशीतरी काही कामानिमित्त प्रत्यक्ष संवाद साधण्याची गरज भासणं असो क्षणात मोबाईल काढून त्यातून अपेक्षित व्यक्तीला थेट व्हिडीओ कॉलच्या (Video Call) माध्यमातून संपर्क साधता येतो. आतापर्यंत एका कॉलमध्ये तुम्ही 8 जणांना एकत्र आणू शकत होतात. पण, आता मात्र यात मोठी अपडेट आली आहे. 

अधिक वाचा : Instagram चे भन्नाट फीचर, इन्स्टाच्या स्टोरीजमध्ये तुम्ही..., वाचा काय आहे नवीन फीचर

 

नवं फिचर कसं काम करतंय हे जाणून घेण्यासाठी तुम्ही अॅप अपडेट करणं गरजेचं आहे. मूळ कंपनी Meta चे CEO मार्क झुकरबर्ग यांनी याबाबतची माहिती दिली. तब्बल 32 जण एका कॉलमध्ये Join होऊ शकतात आणि त्यासाठीची चाचणी सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं. 

( Call Link) ‘कॉल लिंक’चा वापर करत तुम्ही कोणाला हवं त्याला या कॉलमध्ये Add करु शकता. हा व्हिडीओ कॉल पूर्णपणे ‘एन्क्रिप्टेड’ असेल असंही मार्क यांनी सांगितलं. जिथे सथ्या Google Meets वर अशा पद्धतीचे कॉल होत होते, तिथेच आता हातात असणाऱ्या मोबाईलवरूनच तुम्हाला अशा 32 जणांशी एकाच वेळी संवाद साधता येणार आहे. तेव्हा या मिटींग्ससुद्धा Whatsapp वर होणार का हे पाहणं औत्सुक्याचं असेल.