आता, विना Internet Connection पाहा Netflix

Netflix मध्ये आता एक नवीन Feature येणार आहे. ज्यामध्ये तुम्ही विना Internet Connection, Netflix वापरु शकता.

Updated: Feb 23, 2021, 05:43 PM IST
आता, विना Internet Connection पाहा Netflix title=

मुंबई : जर तुम्ही 'OTT Platform users' आणि 'web series' प्रेमी असाल तर आमच्याकडे तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. Netflix मध्ये आता एक नवीन Feature येणार आहे. ज्यामध्ये तुम्ही विना Internet Connection, Netflix वापरु शकता. Netflix मध्ये हा Feature नवीन असला तरी, या अगोदर Smart Downloads असा एक Feature Netflix मध्ये होता, ज्यामध्ये तुम्ही फक्त वेब सीरीज (Web Series) डाउनलोड करू शकत होतात, पण या नवीन Feature मध्ये आता तुम्ही मूव्ही (Movie) सुद्धा Downloads करू शकता.



नक्की काय आहे हा नवीन (Feature) टेक साइड  'telecomtalk' नुसार Netflix ने 'Download for you' हा हल्लीच लॉन्च केलेल्या फीचर आहे. यामध्ये आता तुम्हाला इंटरनेटची गरज भासणार नाही. या Feature च्या माध्यमातून तुम्ही तुमची आवडती वेब सीरीज (web series) किंवा मूव्ही (Movie) download करू शकता.

खरे पाहता नेटफ्लिक्सचे (Netflix) 'Download for you' हे feature आपल्या आर्टिफिशियल इंटेलिजेंस (Artificial Intelligence) वापरुन कार्य करते. म्हणजेच आपण एखादी वेब सीरीज पहात असाल तर नेटफ्लिक्स पुढील भाग स्वतःच आपल्या मोबाइलमध्ये डाउनलोड करेल.

याशिवाय आपली निवड लक्षात घेऊन अॅप स्वतःच असे चित्रपट डाउनलोड करेल. म्हणजेच आपण वायफायच्या ठिकाणी नेटफ्लिक्स वापरत असाल, तर पुढची मालिका किंवा चित्रपट, तो अॅप स्वतःच डाउनलोड करेल. सहली दरम्यान किंवा दूर्गम भागात, हे feature खूपचं उपयुक्त आहे.



Netflix मध्ये 'Download for you' हा Feature वापरायला एकदम सोपा आहे. त्यासाठी तुम्ही अॅपच्या Download ऑप्शन मध्ये जा आणि त्या कंटेंटवर क्लिक करा, जो तुम्हाला डाउनलोड करायचा आहे. तुमच्या फोनमध्ये असलेल्या मेमरीनुसार वेब-सीरीज किंवा मूव्ही डाउनलोड होतील.