Smartphone पासून Smart TV पर्यंत, प्रत्येक वस्तूंवर जबरदस्त Offer

दिवाळी सुरु होण्याआधीच मोठ्या ऑफर्सची घोषणा केली गेली आहे. पाहा कोणत्या वस्तूंवर किती रुपयांचा डिस्काऊंट (Discount) दिला जात आहे.

Updated: Sep 20, 2022, 02:57 PM IST
Smartphone पासून Smart TV पर्यंत, प्रत्येक वस्तूंवर जबरदस्त Offer

Xiaomi Redmi Diwali Sale: सणासुदीचा हंगाम सुरू झाला की ऑनलाईन ऑफर्स देखील सुरु होतात. Flipkart Big Billion Days Sale आणि Amazon Great Indian Festival सोबत, कंपनीने Xiaomi आणि Redmi उत्पादनांवर खास दिवाळी सेलची घोषणा केली आहे. या सेलदरम्यान, तुम्हाला स्मार्टफोन आणि इअरबड्सपासून लॅपटॉप आणि स्मार्ट टीव्हीपर्यंत कंपनीच्या सर्व उत्पादनांवर प्रचंड सूट आणि आकर्षक ऑफरचा लाभ घेण्याची संधी मिळेल. हा सेल 23 सप्टेंबर 2022 पासून Amazon आणि Flipkart प्रमाणे सुरू होईल.

Diwali with Mi Sale ऑफर्स

स्मार्टफोन : Xiaomi 12 Pro 62,999 रुपयांऐवजी 45,499 रुपयांना मिळणार आहे. Xiaomi 11T Pro आणि Xiaomi 11i हायपरचार्ज 120W फास्ट चार्जिंग सपोर्टवरही मोठ्या प्रमाणात सवलत दिली जात आहे. Redmi K50i आणि Redmi Note 11+ Pro वर बी ऑफर आहे. सेलमध्ये तुम्ही रेडमी 10 प्राइम खूप स्वस्तात खरेदी करु शकता.

लॅपटॉप : तुम्ही RedmiBook 15 तुम्ही 28,999 मध्ये खरेदी करू शकता. ज्याची मूळ किंमत 41,999 रुपये आहे. एवढेच नाही तर RedmiBook 15 Pro वर 14 हजार रुपयांची मोठी सूटही दिली जात आहे.

टॅबलेट : स्नॅपड्रॅगन चिपसेटवर काम करणाऱ्या Xiaomi Pad 5 वर चार हजार रुपयांची सूट दिली जात आहे, ज्यामुळे त्याची किंमत 22,999 रुपये असणार आहे. तुम्ही या टॅबलेटचे टॉप मॉडेल 26,999 रुपयांमध्ये खरेदी करु शकता.

इअरबड्स : Mi Sale सोबत तुम्ही दिवाळीमध्ये स्वस्तात इअरबड देखील मिळवू शकता. या सेलसह, तुम्ही TWS इअरबड्स, Redmi Earbuds 3 Pro फक्त 1,499 मध्ये खरेदी करू शकता.

स्मार्ट टीव्ही : 43-इंच A डिस्प्लेसह Xiaomi स्मार्ट टीव्ही 5X हा 27,999 रुपयांना विकला जात आहे. यामध्ये डॉल्बी अॅटमॉस सपोर्ट देखील दिला जात आहे.