Ola Electric To Build Sportiest Car In India: भारतीय ऑटोमोटिव्ह उद्योग क्षेत्र खूप वेगाने विकसित होत आहे. सध्या, परदेशी कंपन्या भारतीय ऑटोमोटिव्ह उद्योगाशी संबंधित आहेत आणि इलेक्ट्रिक कार निर्माता टेस्लासह अनेक कंपन्या भारतात पाय रोवण्यासाठी सज्ज आहेत. मात्र, टेस्लाचा भारतात येण्याचा मार्ग अद्याप तरी खडतर आहे. पण टेस्ला कंपनी भारतात आल्यानंतर येथील स्पर्धा आणखी वाढेल, यात शंका नाही. मात्र असं असलं तरी भारतीय ऑटोमोटिव्ह उद्योगात येत्या काही दिवसात एका कंपनीमुळे स्पर्धा वाढणार आहे.
मारुती, टाटा आणि ह्युंदाई सारख्या अनेक कंपन्या त्यांचे पोर्टफोलिओ एकमेकांपेक्षा चांगले सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण आणखी कार उत्पादक कंपन्या बाजारात आल्या की, अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल. वास्तविक, ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी सांगितले की, ओला इलेक्ट्रिक भारतात स्पोर्टी कार बनवणार आहे. त्यांनी ट्विटरवर कारचा टीझर जारी करून ही घोषणा केली आहे. त्यांनी सांगितलं की, "आम्ही स्पोर्टी कार बनवणार आहोत!"
We’re going to build the sportiest car ever built in India! pic.twitter.com/IyMKgQvTOi
— Bhavish Aggarwal (@bhash) July 16, 2022
ओला इलेक्ट्रिक आधीपासूनच इलेक्ट्रिक कार बनविण्यावर काम करत आहे. याची घोषणा भविश अग्रवाल यांनी देखील केली होती. आता त्यांनी दुसरी कार बनवण्याची घोषणा केली आहे. कंपनी येत्या 2 ते 3 वर्षात कार लाँच करू शकते. सध्या, ओला इलेक्ट्रिक फक्त इलेक्ट्रिक स्कूटर बनवत आहे.