मुंबई : राज्यासह देशात उष्णतेच्या लाटेने सर्वच हैराण आहेत. काही जिल्ह्यांमध्ये तर तापमान 40 अंशांच्या पार गेलंय. उष्णतेवर मात करण्यासाठी अनेकांनी आपआपल्या कुवतीप्रमाणे घरात एसी आणि कूलर लावले आहेत. तसेच काही जण जुन्या कूलरवर गरज भागवतायेत. मात्र जुना कूलर हवी तशी हवा देत नाही. त्यामुळे आम्ही तुम्हाला अशा 3 ट्रीक सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचा कूलर 'सूपरकूल' आणि थंडगार हवा देईल. ज्यामुळे कूलर घेण्याचीही गरज भासणार नाही. (old cooler is not giving cold air in summer do these 3 things)
अनेक जण कूलर उन्हात ठेवतात. ज्यामुळे कूलरमधून थंड हवा येत नाही. जिथे थेट उन पडत नाही, अशा ठिकाणी कूलर ठेवावा. जर घरात प्रत्येक बाजूने उन येत असेल, तर कूलर ठेवण्यासाठी योग्य जागेची व्यवस्था करावी.
कूलर नवीन असो वा जुना त्याला नेहमी मोकळ्या जागी ठेवा. सोप्या शब्दात सांगायचं झालं, तर कूलर खुल्या भागात ठेवल्यास तो थंड हवा देईल. त्यामुळे खिडकीवर कुलर लावा.
कूलर व्हेंटिलेशन नसलेल्या ठिकाणी ठेवला असेल, तर कूलर थंड हवा देणार नाही. कूलरला पुरेसे वेंटिलेशन आवश्यक आहे. खोलीतून हवा बाहेर पडल्यावरच कूलर थंड होईल.