Elon Musk यांच्याकडून Twitter खरेदीला तुर्तास स्थगिती? कुठे शिंकली माशी

 एलोन मस्क यांनी ट्वीटरसोबत 44 अब्ज डॉलरची डील केली होती, पण आज एलोन मस्क यांनी मोठी घोषणा केली 44 अब्ज डॉलर्सची डील मस्क यांनी थांबवली आहे. 

Updated: May 13, 2022, 05:31 PM IST
Elon Musk यांच्याकडून Twitter खरेदीला तुर्तास स्थगिती? कुठे शिंकली माशी  title=

टेस्ला कंपनीचे मालक Elon Musk या वर्षाच्या सुरुवातीपासूनच Twitter च्या डीलमुळे चर्चेत राहिले आहेत. एलोन मस्क यांनी ट्वीटर खरेदी करण्याची इच्छा एक दीड महिन्याआधी व्यक्त केली होती. या ट्वीटर खरेदीच्या डील नंतर एलोन मस्क जगभर चर्चेत आले होते. ट्वीटर हे जगभर वापरले जाणारे सोशल मीडिया अॅप आहे. सेलेब्रिटी, राजकरणी ते विविध क्षेत्रातील लोक या अॅपचा वापर करतात.जगभरात 215 दक्षलक्षाहून अधिक ट्वीटर युजर्स आहेत भारतात सुमारे 2 कोटीहून अधिक लोक ट्वीटरचा वापर करतात. एलोन मस्क यांनी ट्वीटरसोबत 44 अब्ज डॉलरची डील केली होती, पण आज एलोन मस्क यांनी मोठी घोषणा केली 44 अब्ज डॉलर्सची डील मस्क यांनी थांबवली आहे. याबद्दल त्यांनी स्वत ट्वीट करत वृत्ताला दुजोरा दिला आहे. 

एलोन मस्क म्हणाले..  

दरम्यान, एलोन यांनी ट्विट करून लोकांना आश्चर्यचकित केले आहे. आपल्या ट्विट मध्ये ऐलोन म्हणतात "ट्विटर डील तात्पुरते स्थगित करत आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे ट्वीटवर मोठ्या प्रमाणात बनावट खाती आहेत,प्रत्यक्षात 5 टक्क्यांहून कमी युजर्स आहेत ज्यांचे अकाउंट बनावट नाहीत," त्यामुळे तुर्तास ट्वीटरच्या करार होल्डवर ठेवत आहे. इलॉन मस्क यांनी शुक्रवारी आपला निर्णय जाहीर करताना याचे कारणही ट्वीटमध्ये दिले आहे.

ट्वीटरच्या शेअर्समध्ये पडझड

या बातमीनंतर, ट्विटरचे कंपनीचे शेअर्स प्रीमार्केट ट्रेडिंगमध्ये 20 टक्क्यांनी घसरले आहेत. ट्विटरने ऍलनच्या ट्विटला लगेच प्रतिसाद दिला नाही. या तीन महिन्यांत खोट्या किंवा स्पॅम खाती कमी झाल्याचा अंदाज कंपनीने या महिन्याच्या सुरुवातीला व्यक्त केला होता. परंतू एलोन यांच्या ट्वीटमुळे हा अंदाज चुकलाय अशी शक्यता वर्तवली जाते. 

44 अब्ज डॉलर्सची डील

एलोन मस्क यांच्या या डीलनंतर ट्वीटरच्या अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याचे सुद्धा पाहायला मिळाले, तर कंपनीत भरतीप्रक्रिया सुध्दा बंद करण्यात आली आहे. या 44 अब्ज डॉलर्सच्या डीलनंतर ट्वीटर मध्ये अनेक बदल होतील अशी युजर्संना आशा होती. तसेच अनेक युजर्स ट्वीटकरुन एलोन यांना ट्वीटमध्ये काय बदल करावेत याबाबत सूचना सुध्दा देताना पाहायला मिळत होते. 

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला कंपनीचे मालक एलोन मस्क यांनी ट्वीटर करारापूर्वीच सपष्ट केले होते. ट्विटर प्लॅटफॉर्मवरून 'स्पॅम बॉट्स' काढून टाकणे हे त्यांचे प्राधान्य असेल. आता एलोन नेमके भविष्यात या डील बाबत काय निर्णय घेतात हे पाहणे महत्तवाचे असेल.