Online Fraud : अरे देवा, एका मेसेजवर क्लिक करताच 57 हजारांचा गंडा

या ऑनलाइनमुळे दररोज, अनेक लोक सायबर गुन्हेगारांच्या (Cyber criminals) जाळ्यात अडकतात आणि...

Updated: Sep 20, 2022, 02:57 PM IST
Online Fraud : अरे देवा, एका मेसेजवर क्लिक करताच 57 हजारांचा गंडा title=
Online Fraud mobile fund transfer scam Cyber Crime nm

Online Fraud :  देशात आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल (mobile) फोन आल्यामुळे आपण डिजिटलच्या (Digital) दिशेने वाटचाल सुरु केली आहे. आजकाल प्रत्येक जण ऑनलाइन व्यवहार (Online transactions) करतात. गूगल पे (Google Pay), फोन पे (Phone pay) अगदी बँकेच्या अँपद्वारे पैशाचे व्यवहार करण्यावर अनेकांचा कल वाढला आहे. IMPS सारख्या झटपट पेमेंट सुविधा वापरत आहेत. 

पण या ऑनलाइनमुळे दररोज, अनेक लोक सायबर गुन्हेगारांच्या (Cyber criminals) जाळ्यात अडकतात आणि त्यांच्या कष्टाची कमाई गमावतात. अशाच एका घटनेत हरियाणातील (Haryana) कैथलमधील विपुल नावाच्या व्यक्तीला एक मेसेज (msg)आला. ज्यात त्याला गिफ्ट मिळणार असं सांगण्यात आलं होतं. त्याने त्या मेसेजवर क्लिक केलं आणि त्यांची 57 हजारांची फसवूणक झाली. (Online Fraud mobile fund transfer scam Cyber Crime nm)

त्यानंतर विपुलने हरियाणा पोलिसांच्या राज्य गुन्हे शाखेशी संपर्क साधला. काही वेळातच, पोलिसांनी व्यवहार थांबवला आणि विपुलला आता गमावलेल्या 57,000 रुपयांपैकी 50,000 रुपये परत मिळणार आहेत. 

या गोष्टी लक्षात ठेवा (Tips to Avoid Online Fraud)

- तज्ज्ञ सांगतात की, अज्ञात किंवा संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये किंवा ऑनलाइन किंवा ऑफलाइन कोणाशीही बँक तपशील शेअर करू नये.

- जर कोणी तुम्हाला OTP शेअर करण्यास सांगितलं तर तुम्ही तो कधीही कोणाशीही शेअर करू नये. तुम्हाला रोख बक्षीस किंवा लॉटरी बक्षीस संदेश मिळाल्यास, बक्षीस मिळवण्यासाठी तुमची माहिती शेअर करताना सावधगिरी बाळगा.

- स्मार्टफोन वापरकर्त्यांनी हे देखील लक्षात घ्यावे की, त्यांना पैसे मिळविण्यासाठी कधीही कोणताही QR कोड स्कॅन करण्याची आवश्यकता नाही. जेव्हा ते एखाद्या व्यक्तीला पैसे देऊ इच्छितात तेव्हाच QR कोड स्कॅन करणे आवश्यक आहे.