पॅनासॉनिकने लाँच केला नवा स्मार्टफोन..

पॅनासॉनिक इंडियाने बुधवारी 'एलुगा आय2 ऍक्टिव्ह' हा नवा फोन भारतात लाँच केला. या स्मार्टफोनची किंमत ७,१९० रुपयांपासून सुरु होते.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Aug 17, 2017, 08:56 AM IST
पॅनासॉनिकने लाँच केला नवा स्मार्टफोन..  title=

नवी दिल्ली: पॅनासॉनिक इंडियाने बुधवारी 'एलुगा आय2 ऍक्टिव्ह' हा नवा फोन भारतात लाँच केला. या स्मार्टफोनची किंमत ७,१९० रुपयांपासून सुरु होते.

'एलुगा आय2 ऍक्टिव्ह' हा स्मार्टफोन दोन व्हेरियंट २ जीबी आणि १ जीबी रॅम या फिचर्ससहीत उपलब्ध आहे. ज्याची किंमत अनुक्रमे ७,९९० रुपये आणि ७,१९० रुपये आहे. यात ५ इंचाचा आयपीएस डिस्प्ले, २,२०० एमएएचची बॅटरी, ८ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. 

पॅनासॉनिक इंडियाचे उद्योग प्रमुख पंकज राणा यांनी सांगितले की, ''ज्यांना स्टायलिश आणि चांगला सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन वापरायचा आहे अशी लोकांना लक्ष्य करून आम्ही एलुगा आय2 ऍक्टिव्ह लाँच केला आहे."
या स्मार्टफोनमध्ये १६ जीबी इंटर्नल स्टोरेज आहे. पण मायक्रो एसडी कार्ड वापरून त्याची क्षमता १२८ जीबी पर्यंत वाढू शकते. यात १.२५ गिगाहर्ड्स चा क्वाड-कोर प्रोसेसर आहे आणि या अँड्रॉइड फोन ७.० नॉगट या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो.