नवी दिल्ली : तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याच्या तयारीत आहात? मग ही वेळ तुमच्यासाठी खूपच चांगली आहे. कारण, पेटीएमच्या माध्यमातून तुम्ही स्मार्टफोन्स अगदी स्वस्तात खरेदी करु शकणार आहात. पेटीएम मॉलवर मोठ-मोठ्या कंपन्यांचे स्मार्टफोन्स खरेदीवर विविध ऑफर्स दिल्या जात आहेत. पाहूयात कुठल्या स्मार्टफोनवर काय ऑफर आहे.
नोकियाचा स्मार्टफोन पेटीएम मॉलवर 21 टक्के डिस्काऊंटसह विकला जात आहे. या व्यतिरिक्त 18 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक सुद्धा मिळणार आहे. अनेक प्राईस कॅटेगरित नोकियाचे फोन्स डिस्काऊंट आणि कॅशबॅक दोन्ही मिळत आहे. गेल्यावर्षी लॉन्च झालेला नोकियाचा प्लॅगशिप स्मार्टफोन नोकिया 8 पेटीएम मॉलवर 21 टक्क्यांच्या सूटसह 31,500 रुपयांत खरेदी करता येणार आहे. तसेच 5,670 रुपयांचा कॅशबॅकही मिळत आहे. सर्व ऑफर्सनंतर फोनची किंमत 25,830 रुपये होणार आहे.
मोटोरोलाच्या फोन्सवर तब्बल 35 टक्क्यांची सूट मिळत आहे. मोटो जी5एस चा 32GB व्हेरिएंट फोनवर 35% सूटसह 1758 रुपयांचा कॅशबॅकसोबत 8,700 रुपयांत खरेदी करता येणार आहे. मोटो एक्स4 चा 64 GB व्हेरिएंटवर अधिकाधिक कॅशबॅक 4,264 रुपये आहे. हा हँडसेट 19,426 रुपयांत विकला जात आहे.
ओप्पो ए57 फोनच्या 32GB व्हेरिएंटवर 25% डिस्काऊंट मिळत आहे त्यामुळे हा फोन 11,990 रुपयांत खरेदी करता येऊ शकतो. यासोबतच 1,199 रुपयांची कॅशबॅक ऑफरही उपलब्ध आहे. कॅशबॅकनंतर या फोनची किंमत कमी होऊन 10,971 रुपये होणार आहे.
ओप्पो प्रमाणेच Vivo च्या फोन्सवरही 5 टक्क्यांची कॅशबॅक ऑफर उपलब्ध आहे. चीनी कंपनीच्या Vivo V5S स्मार्टफोनवर 31% सूट मिळथ आहे. तसेच 655 रुपयांचा कॅशबॅकही आहे. अशा प्रकारे हा फोन 12,444 रुपयांत खरेदी करता येणार आहे.
यासोबतच अॅपल, गुगल, सॅमसंग, ऑनर, लेनोवो आणि इतर ब्रँड्सचे स्मार्टफोन्स पेटीएम मॉलवरुन स्वस्तात खरेदी करु शकता. अॅपल आयफोन 9,000 रुपयांपर्यंत, सॅमसंग गॅलेक्सी स्मार्टफोन 8,000 रुपयांपर्यंत आणि गुगल पिक्सल डिव्हाईसवर 6,000 रुपयांपर्यंत कॅशबॅक ऑफर मिळत आहे.