close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

पेटीएम सेल : 299 रु. पेक्षाही कमी किंमतीत मिळतोय ब्रॅण्डेड इयरफोन

फ्लिपकार्ट आणि अमेझॉनप्रमाणे आता पेटीएम मॉलवरही महा कॅशबॅक सेल सुरू आहे.

Updated: Oct 11, 2018, 01:40 PM IST
पेटीएम सेल : 299 रु. पेक्षाही कमी किंमतीत मिळतोय ब्रॅण्डेड इयरफोन

मुंबई : फ्लिपकार्ट आणि अमेझॉनप्रमाणे आता पेटीएम मॉलवरही महा कॅशबॅक सेल सुरू आहे. या सेलमध्येही धमाकेदार ऑफर मिळताहेत. यातील कॅशबॅक ऑफरमध्ये ग्राहकांना हेडफोन आणि स्पीकर्सवर 5 हजारपर्यंत डिस्काऊंट मिळतोय.  आयसीआयसीआय बॅंक यूजर्सना तर 10 टक्के डिस्काऊंटही मिळतोय. जर तुम्ही कमी किंमतीत हेडफोन घ्यायचा विचार करतायं तर तुमच्यासाठी ही चांगली संधी असणार आहे.

ब्रॅण्डेड इयरफोन  

'बोट'चा हेडसेट 539 रुपयांपर्यंत ग्राहकांना मिळतोय तर स्कलकॅंडीचे हेडफोन आणि स्पीकर मात्र 499 रुपयांपासून मिळताहेत.

जेबीएल हेडफोन आणि स्पीकर्सवरही जबरदस्त ऑफर सुरू आहे. यामध्ये 299 रुपयांपेक्षाही कमी किंमतीत हेडफोन मिळणार आहेत. 

लीफचे इयरफोन 499 रुपयांपासून उपलब्ध होत आहेत तर वूकी इयरफोनवर कंपनी 15 टक्के डिस्काऊंट देतेयं. या सेलमध्ये वायरलेस ब्लूटूथ स्पीकर, होम थिएटरवर बंपर डिस्काऊंट मिळतोय.

299 रु.पेक्षाही कमी 

299 रुपयांपेक्षा कमी किंमतीतही प्रोडक्ट उपलब्ध आहेत. यामध्ये आयबॉल म्यूजफिट 2 इयरफोन केवळ 278 रुपयांपर्यंत मिळतोयं.

याचे सिस्टका वायरलेस ब्लूटूथ हेडसेट केवळ 214 रुपयांपर्यंत मिळतोय. कंपनीतर्फे या प्रोडक्टवर 81 टक्के डिस्काऊंट मिळतोय.

पॅनासॉनिकचा हेडफोनही केवळ 295 रुपयांत मिळतोय. याशिवाय इतर अनेक कंपन्यांचे हेडफोन 199 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.

जर तुम्हाला इयरफोन किंवा ब्लूटूथ स्पीकर घेऊ इच्छित असाल तर इथे खूप चांगली खरेदी तुम्हाला करता येऊ शकते.