POCO चा जबरदस्त स्मार्टफोन फक्त 749 रुपयांत, खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड

फ्लिपकार्टवर तुमच्यासाठी एक चांगली ऑफर आहे. इतकंच काय तर हा फोन घेणं तुमच्या खिशाला परवडणारा आहे. POCO C31 असं या स्मार्टफोनचं नाव आहे.

Updated: Nov 6, 2022, 09:22 PM IST
POCO चा जबरदस्त स्मार्टफोन फक्त 749 रुपयांत, खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड title=

Poco Smartphone Offer: हल्ली प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन पाहायला मिळत आहे. स्मार्टफोनमुळे (Smartphone) बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या आहेत. अॅप्सच्या माध्यमातून कामं चुटकीसरशी पूर्ण होतात. त्यामुळे स्मार्टफोन म्हणजे जीव की प्राण असतो. पण प्रत्येकालाच स्मार्टफोन परवडेल असं नाही. त्यामुळे काही जण ऑफरची वाट पाहात असतात. जर तुम्हीही अशाच विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. फ्लिपकार्टवर तुमच्यासाठी एक चांगली ऑफर आहे. इतकंच काय तर हा फोन घेणं तुमच्या खिशाला परवडणारा आहे. POCO C31 असं या स्मार्टफोनचं नाव आहे. फोनची किंमत हजार रुपयांपेक्षा कमी आहे. या फोनची किंमत जाणून घेण्यापूर्वी या फोनच्या ऑफरबाबत जाणून घ्या. 

काय आहे ऑफर?

हा एक एंट्री लेव्हल सेगमेंट स्मार्टफोन असून Flipkart वर याची किंमत 8,499 रुपये आहे. पण तुम्ही हा फोन स्वस्तात खरेदी करू शकता. तसेच हजारो रुपयांची बचत करू शकता. वास्तविक, या स्मार्टफोनवर फ्लिपकार्टकडून भरपूर एक्सचेंज बोनस दिला जात आहे. या स्किमचा फायदा घेतल्यास ग्राहकांना स्मार्टफोनच्या खरेदीवर नगण्य रक्कम मोजावी लागेल. या स्मार्टफोनमध्ये 4 GB रॅम, 64 GB इंटरनल स्टोरेज आहे.

तुम्ही Maruti Swift घ्यायच्या विचारात असाल तर जरा थांबा, कारण कंपनी लवकरच...

Flipkart च्या दिवाळी सेलमध्ये, 4 GB रॅम, 64 GB इंटरनल स्टोरेज सह Poco C31 चे मॉडेल उपलब्ध आहे. POCO C31 स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना 7,750 रुपयांचा एक्सचेंज बोनस ऑफर केला जात आहे. ही ऑफर स्वीकारली तर मूळ किंमतीपेक्षा कमी केली जाईल. ग्राहकांना हा फोन फक्त 749 रुपयांमध्ये मिळेल.