close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

इन्स्टाग्रामवर एका फोटो पोस्टचे मिळवा २० हजार

एवढी कमाई होऊ शकते, यावर विश्वास ठेवणे लोकांसाठी अजूनही कठीण असलं, तरी तुम्हाला

Updated: Sep 6, 2018, 09:15 PM IST
इन्स्टाग्रामवर एका फोटो पोस्टचे मिळवा २० हजार

मुंबई : रूचकर जेवण बनवून त्याचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करून तुम्ही लाखो रूपये कमवू शकतात. एवढी कमाई होऊ शकते, यावर विश्वास ठेवणे लोकांसाठी अजूनही कठीण असलं, तरी तुम्हाला मनापासून काही करायचं असेल, तर इंटरनेट तुमचं जीवन बदलून टाकतं.

सुरूवातीला पैसा कमवण्याच्या उद्देशाने आलेल्यांना हातात सहसा यश येत नाही, पण ज्यांना मनापासून हे करावंस वाटतंय, त्यांची लाखो रूपयांची कमाई होते. नोकरीच्या शिफ्टच्या कामापेक्षा हे काम तुम्हाला आनंद देऊन जातं, आणि याच पैशावर तुमचं घर चालू शकतं यावर विश्वास ठेवा.

इन्स्टाग्रामवर एका फोटो पोस्टचे २० हजार रूपये

जर तुम्हाला रूचकर जेवण बनवता येत असेल, तर त्या जे काही तुम्ही बनवलंय त्याचा एक छानसा फोटो काढा. इन्स्टाग्रामवर टाका आणि पाहा, तुम्हाला पुढे जावून एका फोटोचे २० हजार रूपये देखील मिळू शकतात. 

पण यासाठी तुमच्या इन्स्टाग्रामवर तेवढे फ़ॉलोअर्स वाढवण्याची देखील गरज आहे. त्या त्या विषयात तुमचं इन्स्टाग्राम अकाऊंट ओळखलं गेलं पाहिजे. यासाठी तशा प्रकारच्या दमदार पोस्ट करणे गरजेचे आहे.

मीडिया इन्फ्लुएंशर कम्युनिटीच्या सदस्या

नेहा माथुर नावाची महिला हेच काम करत असते. त्या सोशल मीडिया इन्फ्लुएंशर कम्युनिटीच्या सदस्या आहेत. कंपन्या इन्स्ट्राग्रामवर आपल्या ब्रॅण्डला प्रमोट करण्यासाठी अशा लोकांची मदत घेतात. 

नेहासाठी त्यांचं हे काम पैशांचा पाऊस पाडण्यासारखं आहे. इन्टाग्रामवर फोटो पोस्ट केल्यावर त्यांना २० हजार रूपये मिळतात. नेहा म्हणतात की ही सुरूवात त्यांचे उद्योजक पतींसोबत एका दौऱ्यावर गेले असताना झाली.

फॅमिली रेसिपीज इंटरनेटवर

नेहा म्हणतात,  पतीचे दौऱे सुरू असताना मला घरी भरपूर वेळ होता, तेव्हा मी जेवण बनवून इन्स्टाग्रामवर टाकू लागले, फॅमिली रेसिपीज इंटरनेटवर हे फोटो टाकण्यास सुरूवात केली. हळूहळू या कामात मज्जा येऊ लागली आणि मी ४ सदस्यांची टीम नेमली. यांच्यासोबत मी देखील काम करते.

नेहाने इन्स्टाग्रामवर ज्वाईन केल्यानंतर आता २० हजार फॉलोअर्स झाले आहेत.

आता २० हजार फॉलोअर्स

गूगल, यू-ट्यूब, फेसबूक आणि ट्वि‍टरवर मार्केटिंग आता सामान्य झालं आहे, पण फूड ग्रामिंग म्हणजेच फूड पिक्चर पोस्ट करून पैसे कमवण्याची शक्यता जास्तच आहे. कंपन्यांच्या मते भारतात व्यवसायाची शक्यता अधिक आहे. इन्स्टाग्रामवर ७० करोड अॅक्टीव मंथली युझर्सपैकी ३ कोटी हे भारतातून आहेत. यामुळे नेहा माथुर सारख्या फूड ब्लॉगर्सना चांगल्या संधी आहेत.