मुंबई : सध्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आलं आहे. त्यामुळे इंन्टरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे टेलीकॉम कंपन्यांनी आपल्या ग्राहकांसाठी फक्त २०० रूपयांपर्यंत नवीन प्रिपेड प्लॅन लाँच केले आहेत. यामध्ये Jio, Airtel आणि Vodafone या कंपन्यांचा समावेश आहे.
रिलायन्स जिओ
रिलायन्स जिओमध्ये २०० पेक्षा सर्वात कमी १९९ रुपये, १४९ रुपये आणि १२९ रुपयांसारखे प्लॅन आहेत. १९९ रूपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दिवसाला १.५ जीबी डाटा, जीओ टू जीओ अनलिमीटेड कॉलिंग, १०० फ्री एसएमएस अशी सेवा पुरवली जाणार आहे. ही सेवा ग्राहकांना २८ दिवस उपभोगता येणार आहे.
तर, १४९ रूपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दिवसाला १ जीबी डेटा, १०० एसएमएस आणि जीओ टू जीओ अनलिमीटेड कॉलिंग ही सेवा २४ दिवसांसाठी असणार आहे. शिवाय १२९ रूपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना २८ दिवसांसाठी जीबी डेटा, ३०० एसएमएस, जिओ टू जिओ अनलिमिटेड कॉलिंग आणि इतर नेटवर्कवर कॉलिंगसाठी एक हजार मिनिट मिळतात.
एअरटेल
एअरटेलमध्ये २०० पेक्षा सर्वात कमी ९८ रुपये, १४९ रुपये आणि १७९ रुपयांसारखे प्लॅन आहेत. ९८ रुपयांच्या प्लॅनमध्ये २८ दिवसांचा अवधी आहे. यामध्ये ६ जीबी डाटा आणि ३०० मिळतात. पण या प्लॅनमध्ये कॉलिंग फ्री नाही. तर १४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि ३०० एसएमएससह २८ दिवसांचा अवधी आहे.
त्याचप्रमाणे, १७९ रूपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना १४९ रूपयांच्या प्लॅननुसार सुविधा मिळणार आहेत पण या प्लॅनचं वैशिष्ट्य म्हणजे कंपनी आपल्या ग्राहकांना दोन लाख रुपयांचे लाईफ इन्शुरन्स देत आहे.
वोडाफोन
वोडाफोनमध्ये २०० पेक्षा सर्वात कमी १९९ रुपये, १४९ रुपये आणि १२९ रुपयांसारखे प्लॅन आहेत. १९९ रूपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दिवसाला १ जीबी डाटा, अनलिमीटेड कॉलिंग, १०० फ्री एसएमएस अशी सेवा पुरवली जाणार आहे. ही सेवा ग्राहकांना २४ दिवस उपभोगता येणार आहे. यामध्ये वोडाफोन आपल्या ग्राहकांना वोडाफोन प्ले आणि 'झी 5' चे सब्सक्रिप्शनही देत आहे.
शिवाय १४९ आणि १२९ रूपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना २ जीबी डेटा, अनलिमिडेट कॉलिंग आणि ३०० एसएमएस मिळतात. तर १४९ रूपयांच्या प्लॅनचा अवधी २८ दिवस आणि १२९ रूपयांच्या प्लॅनचा अवधी २४ दिवसांचा असणार आहे.