How to block Spam Calls on Android : तुम्हाला आजपर्यंत कधी ना कधी फेक कॉल आला असेलच. अशा कॉल्समुळे आपल्याला खुप इरिटेड होतं. मग यापुढे असे कॉल येणार नाहीत याची सोय म्हणून त्या नंबरला ब्लॉक (Block) करतो. ब्लॉक करुनही आपल्याला फेक कॉल्स किंवा स्पॅम कॉल्स येणं बंद झालंच नाही तर मग आपण Truecaller सारख्या अॅप्लिकेशनचा वापर करणं सुरु करतो. पण अँड्रॉइडच्या (Android) यूजर्ससाठी गुगलकडून ऑपरेटिंग सिस्टिमसोबतच इन-बिल्ट फीचर दिलं जातं ज्याच्या वापराने तुम्ही असे फेक कॉल्स किंवा स्पॅम कॉल्स बंद करु शकता.
गुगलचं (Google) हा फीचर अँड्रॉइड (Android) यूजर्ससाठी कॉल फील्टर प्रमाणेच कामं करतं. तुम्हाला फेक कॉल्स किंवा स्पॅम कॉल आला की, हे फीचर ताबडतोब त्या कॉलला ऑटोमॅटिक ब्लॉक करेल आणि त्यामुळे तुम्हाला असे कॉल्स येणं बंद होईल. हे फीचर फीचर त्याच नंबरसाठी उपयोगात येणार आहे ज्या नंबर्सला युजर्सने स्पॅमच्या कॅटेगरीमध्ये समविष्ट केलं असेल.
आज आम्ही तुम्हाला 'या' फीचर्सला अॅड्रॉइड युजर्सने कसं अॅक्टिवेट करावं याबद्दल सविस्तर सांगणार आहोत.
असे करा Spam Calls बंद...
1. सर्वात प्रथम तुमच्या Android स्मार्टफोनच्या कॉलिंग अॅपमध्ये जा.
2. वर दिलेल्या सर्च बॉक्ससोबतच तीन डॉट्सवर क्लिक करा.
3. येथे तुम्हाला Call History, Settings आणि Help & Feedback हे पर्याय दिसतील. Settings वर क्लिक करा.
4. पुढच्या विंडोमध्ये सर्वात वर दिलेल्या Caller ID & Spam क्लिक करा. येथे तुम्हाला See caller and Spam ID, Filter Spam calls आणि Verified Calls चे टूगल बटन्स दिसतील.
5. दिल्या गेलेल्या टूगलला ऑन करा. असं केल्याने तुम्हाला वेगवेगळे फेक कॉल्स किंवा स्पॅम कॉल्स फिल्टर होऊन येतील.
6. या सेटिंगचा वापर करुन देखील तुम्हाला फेक कॉल्स किंवा स्पॅम कॉल्स येतील. कारण, हे फील्टर केवळ त्याच कॉल्सला ब्लॉक करतो ज्या नंबरला यूजर्सने स्पॅम रिपोर्ट केलं आहे. असं असलं तरी या सेटिंगमुळे तुम्हाला येणारे फेक कॉल्स किंवा स्पॅम कॉल्स मात्र कमी होतील.