Volvo XC40 Recharge Electric: व्होल्वोने मंगळवारी भारतात इलेक्ट्रिक एसयूव्ही व्होल्वो एक्ससी 40 रिचार्ज लाँच केली आहे. गेल्या काही दिवसांपासून कारप्रेमी या गाडीची आतुरतेने वाट पाहात होते. या गाडीची बुकिंग 27 जुलै 2022 पासून सुरु होणार असून डिलिव्हरी ऑक्टोबर 2022 पर्यंत मिळेल. या गाडीची एक्स शोरुम किंमत 55.90 लाख रुपये आहे. जर तुम्ही ही गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या गाडीवर 3 वर्षांची कॉम्प्रिहेंसिव वारंटी, 3 वर्षांसाठी सर्व्हिस पॅकेज, 3 वर्षांसाठी रोड असिस्टेंस, 8 वर्षांची बॅटरी वॉरंटी आणि 4 वर्षांसाठी डिजिटल सर्व्हिस मिळणार आहे. स्वीडनच्या कंपनीने कॉम्पॅक्ट एसयूव्ही व्होल्वो एक्ससी 40 रिचार्ज भारतात असेंबल करणार आहे. या गाडीची स्पर्धा Kia EV6, जग्वॉर I-pace आणि मर्सिडिज ईक्यूसी असेल
नव्या इलेक्ट्रिक एसयूव्हीची मोटर 408 एचपी पॉवर देते आणि 660 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. गाडीत 78 किलोवॅट लिथियम आयन बॅटरी पॅक आहे. बॅटरी फूल चार्ज केल्यावर 418 किमी अंतर कापेल, असा दावा कंपनीने केला आहे. बॅटरी फास्ट चार्जरने 28 मिनिटात 10 टक्क्यांपासून 80 टक्क्यांपर्यंत चार्ज केली जाऊ शकते. ही गाडी फक्त 4.9 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडू शकते.
Introducing the Pure Electric Volvo XC40 Recharge, the first of a whole new range of all-electric vehicles. Smart and versatile, designed For Every You.
To know more: https://t.co/DZ6qw4aXre#XC40Recharge #FutureIsElectric pic.twitter.com/VKwUyo6RMw
— Volvo Car India (@volvocarsin) July 26, 2022
नव्या व्होल्वो एक्ससी40 रिचार्जमध्ये गुगल बिल्ट इन, एअर प्युअरीफायर, 360 डिग्री कॅमेरा, क्रॉस ट्रॅफिक अलर्ट, व्होल्वो कार्स अॅप आणि हारमन कारडॉन प्रीमियम साउंड सिस्टम आहे. सिस्टिमला 600 वॅट एम्पलीफायरचा सपोर्ट आहे. कारमध्ये एअर व्हेंटिलेटेड सबवूफरसहित 13 हायफाय स्पीकर आहेत.