मुंबई : राष्ट्रवादीचे दिवंगत नेते, आणि सर्वसामान्यांमधील नेते म्हणून ओळख असलेले, आर.आर.पाटील यांची वक्तृत्व शैली अनेकांना भावणारी होती. आर आर पाटील यांनी ग्रामीण भागात आपल्या वक्तृत्वाच्या माध्यमातून दबदबा निर्माण केला होता. आर आर पाटील यांचं निधन झाल्यानंतर ग्रामीण महाराष्ट्राला हीच हूरहूर लागून होती. पण आर आर पाटील यांचा मुलगा रोहित ही आबा गेल्यानंतरची कमी कुठे तरी पूर्ण करण्याचा प्रयत्न त्यांच्या वक्तृत्वाच्या माध्यमातून करतोय. (व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली)
आर आर पाटील यांचे सुपूत्र रोहित पाटील देखील, हुबेहुब आर आर पाटील यांच्या शैलीत भाषण करतात. अनेकवेळा ही अतिशयोक्ती वाटू शकते, पण तुम्ही जेव्हा खालील व्हिडीओ पाहाल, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की, रोहित पाटील यांची बोलण्याची शैली हुबेहुब आर आर पाटलांसारखीच आहे...
आणखी दुसरा व्हिडीओ पाहा....