WhatsApp वरुन डीलिट केलेले मॅसेज वाचण्याचा सोपा मार्ग पाहा

फेसबूकच्या मालकीचा असलेला व्हॉट्सऍप वेळोवेळी बरेच नवीन फीचर्स लॅान्च करत असतं.

Updated: Apr 6, 2021, 05:11 PM IST
WhatsApp वरुन डीलिट केलेले मॅसेज वाचण्याचा सोपा मार्ग पाहा

मुंबई: व्हॉट्सऍप एक अतिशय लोकप्रिय मेसेजिंग ऍप आहे. भारतातील असो वा भारता बाहेरील सगळेच लोक व्हॉट्सऍपचा चॅटिंगसाठी वापर करतात. प्रायव्हसीच्या वादात अडकल्यानंतर सुद्धा,अनेक लोकांचे प्राथमिक चॅट ऍप आहे. फेसबूकच्या मालकीचा असलेला व्हॉट्सऍप वेळोवेळी बरेच नवीन फीचर्स लॅान्च करत असतं.

व्हॉट्सऍपने 2017 मध्ये एखाद्या यूझर्सने पाठवलेले मॅसेज डिलीट करण्याचे फीचर बाजारात आणले होते. या फीचरसह, यूझर्स त्यांनी पाठवलेला मॅसेज डीलिट करु शकता. या फीचरद्वारे तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या मोबाईलमधून तुम्ही पाठवलेला फोटो, व्हीडिओ किंवा कोणतीही फाईल डीलिट करु शकता.

एकदा डीलिट केल्यानंतर, प्राप्तकर्ता मॅसेज पाहू शकत नाही. परंतु एक मार्ग आहे ज्याद्वारे डीलिट केलेले मॅसेज व्हॉट्सऍपवर देखील दिसू शकतात. परंतु हे Android फोनवरील थर्ड पार्टी ऍपच्या मदतीने केले जाऊ शकते.

तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की, थर्ड पार्टी ऍप सुरक्षित नसतात. ते ऍप आपला अन्य डेटा देखील वापरू शकतात. त्यामुळे आपल्या स्वत:च्या जोखमीवर ही गोष्ट तुम्ही करुन पाहू शकता. तसेच ज्या मोबाईलमध्ये तुमचे बँक डिटेल्स नसतील किंवा जो मोबाईल बँक ट्रॅन्झॅक्शनसाठी वापरला जात नाही, अशा मोबाईलमध्ये तुम्ही हे थर्ड पार्टी ऍप वापरु शकता.

Android फोन यूझर्स Google Play Store वरून WhatsRemoved +  हा ऍप डाउनलोड करु शकता. एकदा ऍप Install झाल्यानंतर, ऍपला ओपन करुन ऍपला आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या द्या. परवानगी दिल्यानंतर पुन्हा ऍप उघडा.

WhatsRemoved+ ऍप तुम्हाला त्या ऍपचे नोटिफिकेशन सेव्ह करायला सांगेल, ज्यांची तुम्हाला माहिती हवी आहे. त्या List मधून व्हॉट्सऍपचा पर्याय निवडा. आणि नंतर स्क्रीनवर आलेल्या मॅसेजवर यस टाईप करा. आता तुमचा ऍप त्याचे काम करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.

आता जर एखाद्याने व्हॉट्सऍपवरुन एखादा मॅसेज हटवला तर WhatsRemoved+  ऍपमधून तो मेसेज वाचू शकतो. ios यूझर्सना अशा प्रकारच्या कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नाही.