iPhone सारखे फिचर असलेला Realme चा दमदार फोन भारतात लाँच, किंमत फक्त...

Realme C51 Launched: आयफोनसोबत मिळते जुळते असलेला Realme C51 चा फोन भारतात लाँच झाला आहे. या फोनची किंमत व फिचर्स जाणून घ्या

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 4, 2023, 03:50 PM IST
iPhone सारखे फिचर असलेला Realme चा दमदार फोन भारतात लाँच, किंमत फक्त... title=
realme c51 launched with iphone like mini capsule feature check price offer

Realme C51 Launched: जगभरात आयफोनचे वेड कर जगजाहीर आहे. आयफोनचे फिचर पाहून अनेकांना हा फोन घेण्याची इच्छा होते. मात्र त्याची किंमत सर्वसामान्यांच्या बजेट बाहेर आहे. त्यामुळं अनेकांना दुसऱ्या कंपनीच्या स्मार्टफोनवर समाधान मानावे लागते किंवा आयफोनची किंमत कमी होण्यासाठी वाट पाहावी लागते. मात्र, आता तुम्हा किंमत आणि फिचर या दोन्हीबाबत तडजोड करण्याची गरज नाहीये. कारण Realme ने एक बजेट फोन लाँच केला आहे. यात आयफोनसारखे फिचर देण्यात आले आहेत. 

बजेट स्मार्टफोन

रिअलमीने नवीन बजेट स्मार्टफोन Realme C51 लाँच केला आहे. या फोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज देण्यात आला असून फोनमध्ये 8 जीबी डायनॅमिक रॅम आणि 2 टीबीपर्यंत एक्सटर्नल मेमरी सपोर्ट देण्यात आला आहे. मिंट ग्रीन आणि कार्बन ब्लॅक या दोन कलर ऑप्शनमध्ये हा फोन लाँच झाला आहे. 

आयफोनशी मिळते जुळते फिचर

रिअलमीच्या फोनमध्ये एक मिनि कॅप्सूल फिचर देण्यात आले आहे. आयफोन 14 प्रोमध्ये देण्यात आलेल्या डायनॅमिक आयलँड फिचरशी मिळते जुळते हे फिचर आहे. यात चार्जिंग, नोटिफिकेशनची डिटेल मिळते. त्याचबरोबर यात अल्ट्रा बूम स्पीकर आणि फास्ट साइडफिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आले आहेत. 

किंमत व कुठे मिळणार?

Realme C51 स्मार्टफोनच्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी व्हेरियंटची किंमत 8,999 रुपये इतकी आहे. हा फोन सिंगल स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो. रियलमीची वेबसाइट व फ्लिपकार्टवर आजपासून म्हणजेच 4 सप्टेंबरपासून संध्याकाळी ६ वाजल्यापासून फोनची विक्री सुरू होणार आहे. 

स्पेसिफिकेशन

फोनमध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचबरोबर 90 हर्ट्ज रिफ्रेश रेटचा सपोर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर टच सॅपलिंग रेट 180 Hz इतकी आहे. फोनच्या डिस्प्लेची ब्राइटनेस 560 nits आहे. फोनमध्ये अँड्रोइड 13 बेस्ड Realme UI T Edition देण्यात आले आहेत. कॅमेऱ्याबाबत बोलायचे झाल्यास, फोनमध्ये ड्यूल रियर कॅमेऱ्याचा सेटअप देण्यात आला आहे. याचा मेन कॅमेरा 50MP इतका आहे. तर, B&W लेन्स देण्यात आली आहे. यासोबतच फ्रंट कॅमेऱ्यासाठी 5 MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली असून 33W फास्ट चार्गिंज सपोर्ट आहे. फोनचे वजन 186 ग्रॅम इतके आहे.