iPhone सारखे फिचर, 8GB RAM, 128GB स्टोरेज; Realme चा स्वतात मस्त स्मार्टफोन लाँच

Realme ने 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असणारा सर्वात स्वस्त स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने Narzo N53 चा नवा व्हेरियंट लाँच केला आहे. जाणून घ्या या फोनची किंमत आणि इतर माहिती...  

शिवराज यादव | Updated: Oct 24, 2023, 04:55 PM IST
iPhone सारखे फिचर, 8GB RAM, 128GB स्टोरेज; Realme चा स्वतात मस्त स्मार्टफोन लाँच title=

Realme भारतीय बाजारपेठेत रोज नवे फोन लाँच करत असतं. कंपनीची Narzo सीरिज ही खिशाला परवडणारे मोबाईल तयार करण्यावर भर देते. याच सीरिजमध्ये Realme Narzo N53 चा समावेश आहे. कंपनीने आता या मोबाईलचा नवा व्हेरियंट लाँच केला आहे. कंपनीने या मोबाईलचा 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरियंट सादर केला आहे. 

हा स्मार्टफोन आधीपासूनच भारतीय बाजारपेठेत उपलब्ध आहे. कंपनीने याचा 4GB RAM + 64GB स्टोरेज आणि 6GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरियंट लाँच केला होता. आता ब्रँडने 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरियंट सादर केला आहे. जाणून घ्या या मोबाईलची किंमत आणि इतर फिचर्स...

किंमत किती?

Realme चा हा फोन तीन कॉन्फिगरेशनमध्ये येतो. याच्या 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 11 हजार 999 रुपये आहे. कंपनी या मोबाईलवर 1000 रुपयांचा फ्लॅट डिस्काऊंट देत आहे. याशिवाय युजर्सला 1000 रुपयांचा कूपन डिस्काऊंट किंवा बँक ऑफर मिळत आहे. या सर्व ऑफर्सनंतर युजर्सना Realme Narzo N53 च्या 8GB व्हेरियंट 9999 रुपयांत मिळत आहे. 

हा स्मार्टफोन तुम्ही Amazon आणि  Realme स्टोअरमधून 25 ऑक्टोबरपासून खरेदी करु शकता. Realme Narzo N53 च्या 4GB RAM + 64GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 8999 रुपये आहे. तर 6GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 10,999 रुपये आहे.

फिचर्स काय आहेत?

Realme Narzo N53 मध्ये 6.74 इंचाचा LCD डिस्प्ले मिळतो, जो HD+ रेज्योलूशन आणि 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या स्मार्टफोनमध्ये मिनी कॅप्सूल फिचरदेखील मिळतं, जे iPhone च्या डायनॅमिक आयलँड फिचरप्रमाणे काम करतं. हा स्मार्टफोन UniSoC T612 प्रोसेसरवर काम करतो. 

हा स्मार्टफोन खरेदी करताना तुम्हाला 4GB, 6GB आणि 8GB RAM असे तीन पर्याय मिळतात. हँडसेटमध्ये 64GB आणि 128GB स्टोरेजचा पर्यायही मिळतो. हा फोन Android 13 वर आधारित Realme UI T एडिशनवर काम करं. फोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो ज्याची मेन लेन्स 50MP ची आहे. फ्रंटला कंपनीने 8MP चा सेल्फी कॅमेरा दिला आहे. 

सुरक्षेच्या दृष्टीकोनातून साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंन्सर देण्यात आला आहे. डिव्हाइसला पावर देण्यासाठी 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जो 18W च्या चार्जिंगला सपोर्ट करते. यामध्ये USB टाइप-सी चार्जिंग पोर्ट मिळतो. फेदर गोल्ड आणि फेदर ब्लॅक असे रंगाचे दोन पर्याय यामध्ये उपलब्ध आहेत.