मुंबई : Realme काही दिवसात Realme 9 4G स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. हा फोन भारतात 7 एप्रिल रोजी लॉन्च केला जाईल, याला कंपनीने दुजोरा दिला आहे. आता, डिव्हाइसचे लँडिंग पेज फ्लिपकार्ट आणि रियलमी इंडिया वेबसाइटवर दिसून आले आहे. जे त्याच्या काही वैशिष्ट्यांबाबत स्पष्टता देण्यात आली आहे.
Realme 9 4G मध्ये 108MP कॅमेरा आणि 5000mAh जबरदस्त बॅटरी उपलब्ध असणार आहे. Realme 9 4G हा फोन पाठिमागून अगदी आयफोन 13 प्रो मॉडेलसारखा दिसतो. कॅमेरा मॉड्यूल अगदी समान दिलेला आहे. जाणून घ्या Realme 9 4G ची वैशिष्ट्ये आणि डिझाइन.
लिस्टिंगवरून असे दिसून येते की आगामी Realme 9 4G 360Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 1000 nits पीक ब्राइटनेससह 90Hz सुपर AMOLED डिस्प्लेसह सुसज्ज असेल. स्क्रीनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देखील असेल जो हार्ट रेट मॉनिटर करेल. यापूर्वी, Realme ने हे वैशिष्ट्य 9 Pro+ डिव्हाइसेसवर देखील सादर केले होते. Realme 9 Pro+ वर, ते डिव्हाइसवर हार्ट रेट मोजण्याचे साधन उघडून आणि स्क्रीनवर वाचन होईपर्यंत फिंगरप्रिंट स्कॅनरवर बोट दाबून काम करते. त्यामुळे हे वैशिष्ट्य 4G फोनवरही असेच काम करेल अशी अपेक्षा आहे.
यात ट्रिपल कॅमेरा सेटअपसह असणार आहे, ज्यामध्ये 108MP Samsung ISOCELL HM6 प्राथमिक सेन्सर, 120-डिग्री सुपर-वाइड-अॅँगल कॅमेरा आणि मॅक्रो लेन्स असतील. फोनची बॉडी 7.99mm स्लिम असेल आणि वजन फक्त 178 ग्रॅम असेल. याच्या मागील बाजूस रिपल होलोग्राफिक डिझाइन देखील असेल जे ते Realme 9 5G सह सामायिक करेल.
याशिवाय, स्मार्टफोनमध्ये 3.5 मिमी ऑडिओ जॅक, स्पीकर ग्रील आणि खाली यूएसबी टाइप-सी पोर्ट असेल. सनबर्स्ट गोल्ड, मेटियर ब्लॅक आणि स्टारगेज व्हाईट असे स्मार्टफोनचे तीन कलर व्हेरियंट असतील. मिळालेल्या माहितीनुसार हँडसेट 33W जलद चार्जिंगसह 5000mAh बॅटरी पॅक करेल आणि दोन प्रकारांमध्ये असणार आहे. 6GB RAM + 128GB स्टोरेज आणि 8GB RAM + 128GB स्टोरेज मध्ये हा उपलब्ध होईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. या स्मार्टफोनचा 6.6-इंचाचा डिस्प्ले असेल आणि Android 12 आउट-ऑफ-द-बॉक्स एंड्रॉइडवर काम करेल.