नवी दिल्ली : शाओमीने आपला नवा स्मार्टफोन आजपासून बाजारात आणलाय. रेडमी नोट 6 प्रो हा शाओमीचा प्रोडक्ट असून जगातील सर्वात मोठ्या शॉपिंग डे असलेल्या 'ब्लॅक फ्रायडे'च्या दिवसासाठी संभाळून ठेवला होता. 23 नोव्हेंबरला अमेरिकेसहीत अनेक देशांमध्ये ब्लॅक फ्रायडे साजरा केला जाईल. या दिवशी जगातील सर्वात मोठी ऑनलाईन शॉपिंग होणार आहे. या फोनची पहिली विक्री फ्लिपकार्टवर 23 नोव्हेंबरला सुरू होणार आहे. शाओमीचे ग्लोबल वॉईल प्रेसिडेंट तसेच भारताचे प्रबंध निदेशक मनु कुमार जैन यांनी आपल्या ट्वीटरवरून Redmi Note 6Pro च्या लॉंचिंगबाबत घोषणा केली.
याची ऑनलाईन विक्री उद्या म्हणजेच ब्लॅक फ्रायडेला सुरू होईल. या फोन मधून घेतलेले फोटो अद्भूत असून फोटोग्राफीसाठी वेगळा अनुभव देणारा ठरेल. ई- कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने रेडमी नोट 6 प्रोच्या बुकिंगवर शानदार ऑफर ठेवल्या आहेत.
या स्मार्टफोनमध्ये कमी प्रकाशातही चांगले फोटो येतात. नॉच डिस्प्लेसोबत थिक बॉटम चिन असणार आहे.
रेडमी 6 प्रोमध्ये 2 फ्रंट कॅमेरा आणि 2 रियर कॅमरा असणार आहेत.
बॅक कॅमेरा 12 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सल असेल. मेन सेंसरला 1.4 माइक्रान पिक्सलसोबत अपग्रेड केलं गेलंय.
फ्रंटमध्ये 20 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचे कॅमेरा दिले आहेत.
6.26 इंचचा फुल HD+ LCD डिस्प्ले असणार आहे.
कंपनीने या स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल अधिकृत घोषणा केली नाहीयं पण साधारण 15 हजार रुपयांपर्यंत ही किंमत असेल असे जाणकारांचे मत आहे.