'रेडमी नोट ७' आणि 'रेडमी नोट ७ प्रो' सेल सुरु; ग्राहकांसाठी खास ऑफर

स्मार्टफोन आज खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी कंपनीकडून ऑफर देण्यात आली आहे.

Updated: Apr 3, 2019, 01:44 PM IST
'रेडमी नोट ७' आणि 'रेडमी नोट ७ प्रो' सेल सुरु; ग्राहकांसाठी खास ऑफर  title=

मुंबई : चायनीज मोबाईल कंपनी शाओमी Redmi Note 7 आणि Redmi Note 7 Pro या स्मार्टफोनच्या सेलची सुरुवात झाली आहे. रेडमी नोट ७ आणि रेडमी नोट ७ प्रो या दोन्ही फोनची विक्री फ्लिपकार्ट, एमआय टॉट कॉम आणि एमआय होम स्टोअरवरून केली जाणार आहे. दोन्ही स्मार्टफोन कंपनीकडून फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी लॉन्च करण्यात आले होते आणि याची पहिली विक्री मार्च महिन्यापासून सुरु करण्यात आली होती. पहिल्या सेल दरम्यान Redmi Note 7 Pro स्मार्टफोनची दोन लाखांहून अधिक विक्री झाली होती. 

रेडमी नोट ७ आणि रेडमी नोट ७ प्रो हे स्मार्टफोन आज खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी कंपनीकडून ऑफर देण्यात आली आहे. दुपारी १२ वाजता या सेलची सुरुवात झाली. या दोन्ही फोनच्या खरेदीवर ग्राहकांना ११२० जीबी पर्यंतचा हायस्पीड इंटरनेट डाटा फ्री मिळणार आहे. तसेच यूजर्सना एयरटेलकडून अनलिमिटेड कॉलिंग आणि एयरटेल थॅंक्स बेनिफिट मिळणार आहे. रियायन्स जियोच्या यूजर्ससाठी जियोच्या नंबरवर १९८ रुपयांच्या रिचार्जवर डबल डेटा मिळणार आहे. 

Redmi Note 7 Pro 

- ४ जीबी/६४ जीबी मॉडेलची विक्री किंमत १३,९९९
- ६ जीबी/१२८ जीबी  मॉडेलची विक्री किंमत १६,९९९
- ब्लू, नेबुला रेड आणि स्पेस ब्लॅक रंगात उपलब्ध
- ६.३ इंची एलसीडी एचडी डिस्प्ले
- रिजोल्यूशन २३४०*१०८०
- फ्रंन्ट आणि बॅक Corning Gorilla Glass 5 प्रोटेक्शन 
- ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६७५ प्रोसेसर 
- गेमिंगसाठी Adreno 612 GPU ची सुविधा
- ४८ मेगापिक्सल रियर कॅमेरा +  Sony IMX586 इमेज सेंसर + ५ मेगापिक्सल डेप्थ सेंसर
- १३ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा
- AI डिटेक्शन, AI लाइट ट्रेल, AI पोट्रेट 2.0
- ४ हजार व्हिडिओ रेकॉर्डिंग सपोर्ट
- ४०००mAh बॅटरी
- अॅन्ड्रॉइड ९ पाय बेस्ड MIUI 10 

Redmi Note 7

- ३/३२ जीबी स्मार्टफोनची किंमत ९,९९९
- ६/६४ रॅम स्मार्टफोनची किंमत ११,९९९
- onyx ब्लॅक, रुबी रेड, सफायर ब्लू रंगात उपलब्ध
- ६.३ इंची फुल HD+ डिस्प्ले
- कॉर्निंग गोरिला ग्लास ५ प्रोट्क्शन
- क्व़ॉलकॉम, ऑक्टा कोर स्नॅपड्रॅगन ६६० प्रोसेसर
- 'रेडमी नोट ७' ३ जीबी, ४ जीबी, ६ जीबी रॅममध्ये उपलब्ध
- ३२ आणि ६४ जीबी स्टोरेज 
- ४८ आणि ५ मेगापिक्सल रियर ड्युअल कॅमेरा सेटअप
- १३ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा
- ४००० mAh बॅटरी बॅकअप
- ३.३ mm ऑडिओ जॅक देण्यात आला आहे.