मुंबई : कोरोनामुळे (Corona) वर्षभरापेक्षा अधिक कालावधीपासून अधिक लोकं घरीच आहेत. कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले. टीव्हीवरही रिपीट टेलिकास्ट केलं जात आहे. यामुळे नेटीझन्सने सोशल मीडियाला (Social Media) भरभरुन पसंती देत आहेत. यामध्ये फेसबूक, व्हॉट्सअप आणि युट्यूब (Youtube) आघाडीवर आहेत. युट्युबवर विविध वयोगटातील वर्ग हा आपल्या आवडीनुसार व्हीडिओ पाहतो. यामध्ये वेबसिरीज, कॉमेडी, स्टॅन्डअप कॉमेडी, फूड यासारख्या व्हीडिओंचा समावेश आहे. युट्यूबच्या माध्यामातून युट्युबर्स बक्कळ कमाई करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला चाहत्यांचे मनोरंजनही होत आहे. या दरम्यान युट्यूबवर एका व्हीडिओने धुमाकूळ घातला आहे. हा व्हीडिओ सर्वाधिक पाहिला गेला आहे म्हणजेच सर्वाधिक व्हीव्यूज मिळाले आहेत. (registered in guinness book of world records as the most viewed video but what is in the video)
व्हीडीओत नक्की काय?
युट्युबवर Pinkfong! Kids' Songs & Stories अशा नावाचं चॅनेल आहे. या चॅनेलवरील Baby Shark Dance नावाच्या व्हीडिओला नेटीझन्सने सर्वाधिक पसंती दिली आहे. हा व्हीडिओ सर्वाधिक पाहिला गेला आहे. हा एकाप्रकारे अॅनिमेटेड व्हिडीओ आहे. लहान मुलांच्या मनोरंजनाच्या दृष्टीने हा व्हीडिओ बनवण्यात आला आहे. या व्हीडिओत मुलं डान्स करताना पाहायला मिळत आहेत.
कोरोनामुळे ऑफीसचं काम घरी आलं. घरी असल्याने पाल्यांना त्यांची मुलं व्यत्यय आणतात. कामात व्यत्यय येऊ नये म्हणून अनेक पालक मुलांना युट्युबवर कार्टुनचे व्हीडिओ लावून देतात. अशा प्रकारे या व्हीडिओला ताज्या आकडेवारीनुसार 8,695,907,619 इतक्या वेळा पाहिलं गेलं आहे.
हा व्हीडिओ एकूण 2 मिनिटं 16 सेकंदांचा आहे. या व्हीडिओला एकूण 28 मिलीयन लाईक्स मिळाले आहेत. हा व्हीडिओ 18 जून 2016 रोजी युट्युबवर पब्लिश करण्यात आला आहे. तसेच Pinkfong च्या या व्हीडिओची सर्वाधिक पाहिला गेलेला व्हीडीओ म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :
SSC Result 2021 : दहावीचा निकाल या महिन्यात लागणार, वेळेत होणार अकरावीचे प्रवेश
UAEमध्ये 3 शहरांत रंगणार IPL 2021चे सामने, कसं असेल शेड्युल?