रिलायन्स जिओची बंपर ऑफर ; जिओ युजर्संना मिळणार फायदा

रिलायंस जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक बंपर ऑफर सादर केली आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Feb 3, 2018, 03:56 PM IST
रिलायन्स जिओची बंपर ऑफर ; जिओ युजर्संना मिळणार फायदा title=

नवी दिल्ली : रिलायंस जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक बंपर ऑफर सादर केली आहे. जिओच्या लॉन्चनंतर इतर टेलिकॉम कंपन्यांही सातत्याने नवनव्या ऑफर्स सादर करू लागल्या. याचा फायदा नक्कीच युजर्संना होत आहे. आता रिलायंस जिओने गेट अप टू २०० पर्सेंट कॅशबॅक ऑफर सादर केली आहे. या ऑफरमध्ये युजर्संना ७९९ रुपयांचा कॅशबॅक मिळेल. या प्लॅनचा फायदा तुम्ही १५ फेब्रुवारीपर्यंत घेऊ शकता. 

ही आहे ऑफर

या ऑफरमध्ये जिओ युजर्संने ३९८ रुपये किंवा त्याहुन अधिकचा रिचार्ज केल्यास त्यांना ७९९ रुपयांचा कॅशबॅक मिळेल. ३९८ रुपयांचा रिचार्ज जर जिओ युजर्संने MyJio अॅप किंवा Jio.com ने केल्यास त्यांना १००% म्हणजेच ४०० रुपयांचे इंस्टेंट कॅशबॅक मिळेल. यात तुम्हाला ५०-५० रुपयांचे ८ व्हॉऊचर्स मिळतील. हे व्हाऊचर तुम्ही ३०० रुपयांपेक्षा अधिकचे रिचार्ज करण्यासाठी वापरू शकता. त्याचबरोबर युजर्स ९१ रुपयांहुन अधिकचा रिजार्ज एड-ऑन करण्यासाठी या व्हाऊचरचा वापर करु शकतात.

इतकी मिळेल कॅशबॅक

मोबिक्विक मोबाईल वॉलेटवर देखील जिओच्या नव्या आणि जुन्या ग्राहकांना रिचार्जवर ३९९ रुपयांचा कॅशबॅक मिळेल. रिचार्ज करणाऱ्या नवीन युजर्सला पेटीएमवर ५० रुपयांचा कॅशबॅक तर जुन्या युजर्संना २० रूपयांचा कॅशबॅक मिळेल. तर अॅमेझ़ॉन पे वर ५० रुपये कॅशबॅक मिळेल. फोन पे वॉलेटवर युजर्सला ७५ रुपये आणि फ्रिचार्जवर ५० रुपयांचे कॅशबॅक मिळेल. 

३९९ रुपयांची ऑफर

भीम युजर्सना रिचार्जवर १०० रुपये आणि जून्या युजर्सना ३० रुपये कॅशबॅक मिळेल. ही ऑफर १ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत उपलब्ध असेल. जिओच्या ३९९ रुपयांच्या रिचार्जवर युजर्संना ८४ दिवसांसाठी प्रत्येक दिवशी १.५ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉल्सची सुविधा मिळेल. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x