Jioचा नवीन प्लान, रोज 3GB डेटा आणि अनलिमिटेड कॉल

रिलायंस जिओने दूसऱ्या टेलिकॉम कं‍पन्यांची सध्या झोप उडवली आहे.   

Updated: Jun 27, 2020, 11:43 PM IST
Jioचा नवीन प्लान, रोज 3GB डेटा आणि अनलिमिटेड कॉल

नवी दिल्ली : रिलायंस जिओने दूसऱ्या टेलिकॉम कं‍पन्यांची सध्या झोप उडवली आहे. सर्व कंपन्या आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवीन नवीन प्लान बाजारात आणत आहे. त्यातमध्ये जिओने कमी काळात ग्राहकांच्या मनात राज्य केलं आहे. जिओ टेलिकॉम कंपनी ग्राहकांसाठी नवीन प्लान बाजारात आणत असते.   कंपनीने नुकताच ४०१ रुपये, २५९९ रुपये आणि २३९९ रुपयांचा डेटा प्लान लाँच केला आहे. तर जाणून घ्या ४०१ रुपये प्लानची वैशिष्ट्य

कंपनीने लाँच केलेल्या ४०१ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना ३ जीबी डेटा ऑफर केले जाते. तसेच याशिवाय, ६ जीबी डेटा मिळतो. या प्लानची वैधता २८ दिवसांसाठी असणार आहे. या प्लानमध्ये दररोज मिळणारा डेटा संपल्यानंतर स्पीड कमी होऊन 64Kbps होते. 

जिओच्या या प्रीपेड योजनेमध्ये ग्राहकांना जिओ नेटवर्कवर कॉलिंगसाठी अनलिमिटेड मिनिट मिळतात. त्याचप्रमाणे १००  एसएमएस दररोज मिळतात. महत्त्वाचं म्हणजे जिओच्या या प्लानमध्ये ग्राहकांना  ३९९ रुपयांच्या किंमतीचे डिज्नी प्लस हॉटस्टार मेंबरशीप एक वर्षांपर्यंत फ्री मिळणार आहे.

याशिवाय 3जीबी डेटा हा ९९९ रूपये आणि ३४९ रूपयांच्या प्लानमध्ये देखील देण्यात येतो. ९९९ रूपयांच्या प्लानची वैधता ८४ दिवसांसाठी असते. तर ३४९ रूपयांच्या प्लानची वैधता २८ दिवसांसाठी असते.