इंटरनॅशनल कॉल्स फक्त ५० पैसे प्रति मिनिट

 इंटरनॅशनल कॉल करणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

Updated: May 11, 2018, 07:41 AM IST
इंटरनॅशनल कॉल्स फक्त ५० पैसे प्रति मिनिट title=

नवी दिल्ली : रिलायन्स जियोने आपल्या ग्राहकांसाठी शानदार ऑफर आणली आहे. इंटरनॅशनल कॉल करणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. १५ मे पासून कंपनीचा नवा प्लान येणार आहे. यासोबतच कंपनीने इंटरनॅशनल कॉलिंग आणि इंटरनॅशनल रोमिंग ऑफरदेखील आणली आहे. जियो पोस्टपॅड प्लानचा हा एक भाग आहे. या प्लाननुसापर दरमहा १९९ रुपये प्रति महिना बील येईल. या प्लानमध्ये इंटरनॅशनल कॉल फक्त ५० पैसे प्रति मिनिट आणि इंटरनॅशनल रोमिंग २ रुपये प्रति मिनिट असणार आहे. ग्राहकांना आपल्या नंबरवर इंटरनॅशनल कॉल सर्व्हिस सुरू करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे सिक्योरिटी डिपॉझीट करण्याची गरज नाही.

मिनिटाला २ रुपये 

इंटरनॅशनल कॉलिंग प्लाननुसार जियो कस्टमर्स अमेरिका किंवा कॅनडाला ५० पैसे प्रति मिनिट हिशोबाने कॉल करु शकता. बांगलादेश, चीन, फ्रांस आणि यूकेमध्ये कॉल करण्यासाठी प्रति मिनिट २ रुपये खर्च करावा लागेल. इस्त्रायल, नायझेरिया, साऊदी अरब, स्वीडेन आणि अन्य देशात एक मिनिट बोलल्यास ६ रुपये प्रति मिनिट खर्च येणार आहे. जियो कस्टमर्ससाठी इंटरनॅशनल रोमिंग २ रुपये प्रति मिनिट सुरू होईल. यासाठी कोणता डेटा पॅक घेण्याची गरज नाही.