नवी दिल्ली : फ्रान्समधील ऑटो कंपनी रेनो ने SUV कॅटेगरीत आपली कॅप्चर (Capture) भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे.
कंपनीने या कारचे तीन मॉडेल्स RXE, RXL आणि RXT बाजारात लॉन्च केले आहेत. तीन्ही मॉडेल्स पेट्रोल आणि डिझेल इंजिनमध्ये उपलब्ध आहेत. यापैकी सर्वात महाग मॉडेल्स हे डिझल इंजिनचं असणार आहे.
कारची बुकींग २५ हजार रुपये देऊन केली जाऊ शकते. कंपनीच्या मते, कॅप्चर ही कार भारतातील सर्वात स्टायलिश एसयूव्ही असणार आहे.
रेनो कॅप्चर गाडीत डस्टर १.५ लीटर पेट्रोल आणि १.५ लीटर डिझेल इंजिनचा वापर करण्यात आला आहे. पेट्रोल इंजिन १०५ बीएचपी पॉवर आणि १४२ एनएमचं टॉर्क जनरेट करतं. इंजिनला ५ स्पीड मॅन्युअल आणि CVT गेअरबॉक्स देण्यात आला आहे. डिझेल इंजिन १०८ बीएचपीची पॉवर जनरेच करतं.
कॅप्चरमध्ये फुल एलईडी हेडलॅम्प, कॉन्ट्रास्ट रूफ, ड्युअल एयरबॅग्ज, एबीएस, ईबीडी, आयसोफिक्स, ७.० इंच टच स्क्रिन इंफोटेनमेंट सिस्टम सारख्या फिचर्सचा समावेश आहे.
रेनो कॅप्चरच्या स्टँडर्ड मॉडेल्समध्ये ड्युअल एयरबॅग्ज, एबीएस सारखे फिचर्स आहेत. टॉप मॉडेलमध्ये फ्रंट आणि साईड एअरबॅग्जसोबत हिल स्टार्ट असिस्ट सारखे अतिरिक्त फिचर्स देण्यात आले आहेत.
रेनो कॅप्चर RXE - ९.९९ लाख रुपये
रेनो कॅप्चर RXL - ११.०७ लाख रुपये
रेनो कॅप्चर RXT - ११.६९ लाख रुपये
रेनो कॅप्चर RXE - ११.३९ लाख रुपये
रेनो कॅप्चर RXL - १२.४७ लाख रुपये
रेनो कॅप्चर RXT - १३.०९ लाख रुपये
रेनो कॅप्चर PLATINE - १३.८८ लाख रुपये