तणाव - झोप नियंत्रण फिचर्ससहीत 'गॅलक्सी वॉच' लॉन्च

'एक्सिनोज 9110 ड्युएल कोअर 1.15 गीगाहर्टज' प्रोसेसरसहीत

Updated: Sep 22, 2018, 10:58 AM IST
तणाव - झोप नियंत्रण फिचर्ससहीत 'गॅलक्सी वॉच' लॉन्च  title=

मुंबई : सॅमसंग इंडियानं शुक्रवारी भारतीय बाजारात 'गॅलक्सी वॉच' लॉन्च केलंय. या स्मार्टवॉचचं वैशिष्ट्य म्हणजे, यातील तणाव आणि झोपेवर नियंत्रण मिळवण्यासाठीची फिचर्स... सॅमसंगनं गॅलक्सी वॉचचे दोन व्हेरिएन्ट सादर केलेत. या वॉचमध्ये सॅमसंगचं ट्रेडमार्क सर्क्युलर, बेजल युझर इंटरफेस (यूआय), अॅनालॉग वॉचफेस आणि ऑलवेज ऑन डिस्प्ले असे फिचर्स दिसतात. यामध्ये 'एक्सिनोज 9110 ड्युएल कोअर 1.15 गीगाहर्टज' प्रोसेसर देण्यात आलाय. 

महत्त्वाचं म्हणजे, हे वॉच तुम्ही फॅशन एक्सेसरीज म्हणूनही वापरू शकाल. एकदा बॅटरी चार्ज केल्यानंतर अनेक दिवस तुम्ही हे वॉच सहज वापरू शकाल. तसंच गॅलक्सी वॉचमध्ये कॉलिंग, मेलिंग, नोटिफिकेशन्स आणि एक्टिव्हिटीजच्या सुविधा देण्यात आलीय. 

येत्या ऑक्टोबरपासून हे वॉच विक्रिसाठी उपलब्ध असेल. सिल्व्हर, मिडनाइट ब्लॅक आणि गोल्डन अशा तीन रंगांत हे उपलब्ध असेल. 

याच्या 46 मिमी वर्जनची किंमत 29,900 रुपये तर 42 मिमी वर्जनची किंमत 24,990 रुपये निर्धारित करण्यात आलीय.