Samsung वापरकर्त्यांना धक्का! इतके महिने 5G सेवा वापरता येणार नाही, कारण...

5G Network : सॅमसंग 5G वापरकर्त्यांना धक्का बसणार आहे. सॅमसंग वापरकर्ते सध्या 5G सेवा वापरू शकणार नाहीत. यासाठी त्यांना बराच काळ वाट पाहावी लागणार आहे. एका रिपोर्टनुसार अॅपल आयफोन यूजर्सलाही यासाठी बराच वेळ वाट पाहावी लागणार आहे. सॅमसंग वापरकर्त्यांना 5G सेवा किती काळ मिळेल ते जाणून घ्या. 

Updated: Oct 16, 2022, 12:49 PM IST
Samsung वापरकर्त्यांना धक्का! इतके महिने 5G सेवा वापरता येणार नाही, कारण... title=

5G Network :  1 ऑक्टोबरपासून भारतामधील महत्वाच्या शहरात 5G सेवेचा शुभारंभ झालाय. जिओ, एअरटेल आणि व्हीआय या टेलिकॉम कंपन्याकडून महत्वाच्या शहरामध्ये 5G सेवा दिली जाणार आहे. Airtel आणि Jio ने 5G सेवा सुरू केली आहे. परंतु, बहुतेक वापरकर्ते ही सेवा वापरू शकत नाहीत. नुकत्याच आलेल्या अहवालानुसार, डिसेंबरपर्यंत Apple आणि Samsung मोबाईल फोनवर 5G सपोर्ट उपलब्ध असेल. म्हणजेच Apple आणि Samsung च्या 5G फोन वापरकर्त्यांना 5G साठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. (samsung 5g ota or software update will come on this month )

 

अपडेट नोव्हेंबरमध्ये येईल

टेलिकॉम ऑपरेटर्ससोबत काम करत आहेत. नोव्हेंबर 2022 च्या मध्यापर्यंत वापरकर्त्यांना 5G डिव्हाइसेससाठी OTA अद्यतने मिळतील. अशी माहिती सॅमसंगनकडून देण्यात आली आहे.

या OTA अपडेटनंतरच सॅमसंग वापरकर्ते त्यांच्या 5G स्मार्टफोनवर वापरू शकतील. त्यापूर्वी त्याच्या सॅमसंग मोबाईलमध्ये 5G नेटवर्क येणार नाही. म्हणजेच सॅमसंगच्या वापरकर्त्यांना मोठा झटका बसला आहे.

निवडक शहरांमध्ये 5G सेवा सुरू

सॅमसंग फोन वापरकर्त्यांना 5G सेवा उपलब्ध झाली तरीही यासाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागेल. तथापि, 5G सेवा सध्या बहुतांश उपकरणांवर उपलब्ध नाही. हळूहळू सर्व मोबाईल कंपन्या हे अपडेट जारी करतील. एअरटेल आणि जिओने फक्त निवडक शहरांमध्ये 5G सेवा सुरू केली आहे. सध्या कंपनी ट्रायल म्हणून देत आहे.

वाचा : 20 वर्षापूर्वी देशाबद्दल काय होते विचार? PM मोदींच्या खाजगी डायरीतील 'ते' पान व्हायरल 

एअरटेल वापरकर्ते केवळ 4G प्लॅनवर 5G सेवा वापरण्यास सक्षम असतील. तर कंपनी जिओ वापरकर्त्यांना बीटा टेस्टिंगमध्ये अमर्यादित डेटा देत आहे. पुढील वर्षापर्यंत कंपन्या देशातील बहुतांश भागात 5G सेवा देण्यास सुरुवात करतील. म्हणजेच 5G साठी लोकांना बराच वेळ वाट पाहावी लागणार आहे.

Apple बद्दल असेही म्हटले गेले आहे की, iPhones मध्ये 5G वापरण्यासाठी तुम्हाला खूप वेळ प्रतीक्षा करावी लागेल. यासाठी लोकांना डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागेल. मात्र, याबाबत कंपनीकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केले जाणार नाही.