नवी दिल्ली : देशात व्हेअरेबल डिव्हाईसची मागणी वाढत आहे. सॅमसंगने सहा महिन्यांपुर्वी प्रीमियम स्मार्टवॉचमध्ये ५०% भागीदारी मिळवली. त्यात सॅमसंगच्या फ्लगशिप स्मार्टवॉच गियर एस3 चे मोठे योगदान आहे, असे कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले.
सॅमसंग इंडियाचे महाप्रबंधक आदित्य बब्बर यांनी सांगितले की, सॅमसंग गियर एस 3 स्मार्टवॉचच्या विक्रीत असाधारणपणे वाढ झाली आहे. सणाच्या काळात हे प्रमाण ७०% नी वाढले होते. त्यामुळे बाजारात स्मार्टवॉच यशस्वी ठरतील, असा विश्वास त्यांना आहे.
सॅमसंगने बुधवारी जीपीएस लेस स्पोर्ट्स ब्रॅंड गियर फिट2 प्रो आणि गियर स्पोर्ट स्मार्टवॉच लॉन्च केला. यात १.२ इंच एमोलेड डिस्प्ले आणि फिरणारा बेजल यूजर इंटरफेस (यूआई) आहे. तसंच ३०० एमएएच ची बॅटरी आहे. जी तुम्ही वॉयरलेस पद्धतीने चार्ज करता येईल.