सॅमसंगनं लॉन्च केले दोन नवे स्मार्टफोन

सॅमसंगनं भारतामध्ये जे7 प्रो (samsung j7 pro)आणि  जे7 मॅक्स (samsung j7 max)हे दोन नवे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. 

Updated: Jun 14, 2017, 09:06 PM IST
सॅमसंगनं लॉन्च केले दोन नवे स्मार्टफोन title=

मुंबई : सॅमसंगनं भारतामध्ये जे7 प्रो (samsung j7 pro)आणि  जे7 मॅक्स (samsung j7 max)हे दोन नवे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. या दोन नव्या स्मार्टफोनमुळे सॅमसंगचे J सीरीजमध्ये आता १० स्मार्टफोन झाले आहेत. २० जूनपासून जे7 मॅक्स तर जे7 प्रो जुलैच्या दुसऱ्या आठवड्यानंतर बाजारात येणार आहे.

काय आहेत फोनची फिचर्स?

जे7 मॅक्स या स्मार्टफोनमध्ये ५.७ इंचाची स्क्रीन, १.६ गीगाहर्ट्स ऑक्टोकोर प्रोसेसर, ४ जीबी रॅम, ३ जीबी मेमरी, १३ मेगापिक्सल कॅमेरा आणि ३३०० एमएच बॅटरी आहे. या फोनची किंमत १७,९०० रुपये एवढी आहे. तर गॅलेक्सी जे7 प्रो मध्ये ५.५ इंचाची स्क्रीन, ३ जीबी रॅम, ६४ जीबी मेमरी आणि ३६०० एमएच बॅटरी आहे. या फोनची किंमत २०,९०० रुपये असणार आहे.