मुंबई : नव्या वर्षात चायनीज स्मार्टफोन्सना टक्कर देण्यासाठी सॅमसंग इंडिया जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात नवा गॅलॅक्सी ऑन लाँच करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या नव्या डिव्हाईसची किंमत १५ हजारांच्या जवळपास असेल.
गॅलॅक्सी ऑन हा स्मार्टफोन दोन पर्यायांमध्ये उपलब्ध असणार आहे. दोघांमध्ये ४ जीबी रॅम कायम असणार आहे. हा स्मार्टफोन अॅमेझॉन इंडियावर उपलब्ध असेल.
२०१७मध्ये सॅमसंग इंडियाने १६,९००रुपये किंमतीचा गॅलॅक्सी ऑन मॅक्स बाजारात आणला होता. यात रेयर कॅमेर १३ मेगापिक्सेल आणि एलईडी फ्लॅशसह फ्रंट कॅमेरा देण्यात आला होता.
कंपनीच्या या नव्या स्मार्टफोनमध्ये ५.७ इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आलाय. या स्मार्टफोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटरनल मेमरी स्टोरेज देण्यात आलाय. यात २५६ जीबीपर्यंत मेमरी वाढवता येते.