मुंबई : जगभरातील मोबाईल कंपन्या भारतात आपला बाजार कायम ठेवण्यावर लक्ष केंद्रीत करतात. आताच्या डिजिटल युगात एकाहून एक उत्तम स्मार्टफोन बाजारात आहेत. मोबाईल कंपन्यांमध्ये एकमेकांत मोठी स्पर्धा असते. हेच कारण आहे की, दररोज नवीन फोन लॉंच होत असतात.
भारतात ६ जुलै रोजी लॉंच होणार सॅमसंग गॅलेक्सी
सॅमसंग कंपनी गॅलक्सी एफ २२ लॉंच करणार आहे. फ्लिपकार्टवर हा फोन ६ जुलैला उपलब्ध असणार आहे. या फोनमध्ये 90Hz HD + डिस्प्ले आणि 48 मेगापिक्सल क्वाड कॅमेरा सेटअपसारखे फीचर्स असणार आहेत. या मोबाईलची ऑनलाईन विक्री प्लिपकार्टवर होणार आहे. अद्याप गॅलक्सी एफ २२ च्या किंमतीबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नाही.
Make way for the newest blockbuster in town. Presenting #FullOnBlockbuster Samsung Galaxy F22, with a sAMOLED 90Hz Display and a massive 6000mAh battery and True 48MP Quad Camera, Launching on 6th July, 12 noon onwards on Flipkart.
— Flipkart (@Flipkart) July 4, 2021
फीचर्स
या स्मार्टफोनमध्ये 6.4 इंचाचा HD + अमोलेड डिस्प्ले असणार आहे. सोबतच 90 Hz रिफ्रेश रेट उपलब्ध असणार आहे. स्मार्टफोनला ६ हजार mhची बॅटरी असणार आहे. प्रायमरी कॅमेरा ४८ मेगापिक्सल असणार आहे.