सॅमसंगचा नवा फ्लिप स्मार्टफोन SM-G9298 लॉन्च

या स्मार्टफोनमध्ये २ स्क्रीन देण्यात आल्या आहेत.  सॅमसंगनं W2017 फ्लिप फोन हा मागील वर्षी लाँच केला होता. 

Updated: Aug 4, 2017, 08:16 PM IST
सॅमसंगचा नवा फ्लिप स्मार्टफोन SM-G9298 लॉन्च title=

मुंबई :  सॅमसंगनं  नवं व्हेरिएंट SM-G9298 लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये २ स्क्रीन देण्यात आल्या आहेत.  सॅमसंगनं W2017 फ्लिप फोन हा मागील वर्षी लाँच केला होता. 

या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८२१ चिपसेट प्रोसेसर देण्यात आलं आहे. तसेच यात ४ जीबी रॅमही देण्यात आली आहे. सॅमसंग SM-G9298 स्मार्टफोनमध्ये ड्यूल सिम सपोर्ट आहे. यामध्ये ४.२  इंच ड्यूल स्क्रिन असून त्याचं रेझ्युलेशन 1080×1920 पिक्सल आहे. 

 तसेच या स्मार्टफोनमध्ये ६४  जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली असून २५६ जीबीपर्यंत मेमरी वाढवता येऊ शकते.यामध्ये १२  मेगापिक्सल रिअर कॅमेरा तर ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे.

या स्मार्टफोनमध्ये २३००  mAh बॅटरी देण्यात आली आहे. यामध्ये ४जी, ब्ल्यूटूथ, जीपीएस, यासारखे कनेक्टिव्हिटीचे ऑप्शनही देण्यात आले आहेत.दरम्यान, कंपनीनं अद्याप या फोनच्या किंमतीबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.