भारत सरकारचं Sandes अ‍ॅप WhatsApp मेसेजिंग अ‍ॅपला टक्कर देणार?

भारत सरकारने व्हॉट्सअपला टक्कर देण्यासाठी संदेस लाँच केलं आहे.

Updated: Jul 31, 2021, 10:18 AM IST
भारत सरकारचं Sandes अ‍ॅप WhatsApp मेसेजिंग अ‍ॅपला टक्कर देणार? title=

मुंबई : आपल्या प्रत्येकाच्या फोनमध्ये व्हॉट्सअप असतं आणि जवळपास प्रत्येकजण व्हॉट्सअपचा वापर करतं. मात्र भारत सरकारने व्हॉट्सअपला टक्कर देण्यासाठी संदेस लाँच केलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून यावर काम सुरु होतं आणि लिमिटेड लोकांसाठी हे जारी देखील करण्यात आलं होतं. 

दरम्यान या इंस्टेंड मेसेजिंग प्लॅटफॉर्मला नॅशनल इनफॉर्मेटिक्स सेंटरने तयार केलं आहे. नॅशनल इनफॉर्मेटिक्स सेंटर हे भारती IT मंत्रालयाच्या अंतर्गत येतं. तर संदेसच्या कामाची पद्धत व्हाट्सअप प्रमाणे असून याचा लोगो देखील व्हॉट्सअप सारखाच आहे. 

या प्लॅटफॉर्मवर युजर्स मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडीद्वारे साइन अप करू शकतात. सध्याच्या स्थितीत भारत सरकारने केवळ कर्मचारी हे अॅप वापरत आहेत. याशिवाय, सरकारी संस्थांमध्ये काम करणाऱ्या लोकांनाही ते वापरण्यासाठी देण्यात आले आहे. मेसेजिंग कम्युनिकेशनसाठी या अॅपचा वापर करण्यात येतो. 

Sandes हे सरकारद्वारे होस्ट केलेलं ओपन सोर्स बेस्ड सिक्युअर क्लाउड एनेबल्ड प्लॅटफॉर्म आहे. याचं कारण म्हणजे त्याचं धोरणात्मक नियंत्रण भारत सरकारकडे राहतं. या व्यासपीठाची अनेक वैशिष्ट्यं आहेत. सिंगल चॅट, ग्रुप मेसेजिंग, फाइल शेअरिंग आणि ऑडिओ व्हिडीओ कॉल्स देखील यातून करता येतात.

हे अॅप गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड केलं जाऊ शकतं. डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला फोन नंबर एंटर करावा लागणार आहे. ओटीपीद्वारे तुम्हाला साइन इन करावं लागणार आहे. आता त्यात एंड टू एंड एन्क्रिप्शन दिलं आहे की नाही हे पाहणे महत्त्वाचं असेल.

व्हॉट्सअॅपचं सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची एन्क्रिप्शन सिस्टम. या अॅपमध्ये एंड टू एंड एन्क्रिप्शन आहे. असा दावा केला जातो की, सेंडर किंवा रीसिवर व्यतिरिक्त, कोणतीही तिसरी व्यक्ती चॅट वाचू शकत नाही, अगदी कंपनी देखील नाही. अशा संदेश अॅपमध्ये परिस्थितीत, एंड-टू-एंड एन्क्रिप्शन  येईल की नाही, हे सांगता येणार नाही.

जर संदेस अॅपमध्ये एंड-टू-एंड एन्क्रिप्शन नसेल तर ते व्हॉट्सअॅपला टक्कर देऊ शकत नाही. कारण वापरकर्त्यांच्या प्रायवर्सी दृष्टीने एंड टू एंड एन्क्रिप्शन ही एक मोठी गोष्ट आहे. एंड-टू-एंड एन्क्रिप्शनशिवाय अॅप्समधील डेटा थर्ड पार्टीद्वारे ऐक्सेस केला जाऊ शकतो.