नवी दिल्ली : नवी मुंबईचा 4G इंटरनेट स्पीड देशाच्या अन्य शहरांच्या तुलनेत खूप अधिक आहे. ओपेनसिग्नल रिपोर्टनुसार, नवी मुंबईत 4G इंटरनेट स्पीड ८.७२ एमबीपीएस आहे. तर चेन्नईने मार्च २०१७ मध्ये 4G इंटरनेटचा स्पीड दुप्पट करण्यात यश प्राप्त केले आहे. पूर्वी हा स्पीड ४.४ एमबीपीएस होता आता मात्र ८.५२ एमबीपीएस इतका झाला आहे. ८.४६ एमबीपीएससोबत कोलकत्ता तिसऱ्या स्थानावर आहे. भारतात 4G जियोचे जबरदस्त प्रस्थ असताना देखील पूर्ण जगातील आकड्यांनुसार 4G इंटरनेट स्पीडच्या बाबतीत भारताचा क्रमांक खालचा आहे.
रिपोर्टनुसार, भारताने 4G इंटरनेट स्पीडच्या जगात ८२.२६% सोबत १४ वे स्थान प्राप्त केले आहे. हे स्थान म्हणजे तसा चांगला संकेत आहे. पण 4G स्पीडच्या बाबतीत भारताचा क्रमांक तसा शेवटचा आहे.
या यादीत सिंगापूरचा प्रथम क्रमांक लागतो. ४४.३१ एमबीपीएस स्पीडसोबत सिंगापूर जगात अव्वल आहे.