Smartphone Tips : स्मार्टफोनच्या खराब बॅटरीमुळे हैराण आहात? अशा प्रकारे वाढवा बॅटरीचं आयुष्य

Smartphone Tips : तुमच्या स्मार्टफोनच्या बॅटरीवर परिणाम होतो का?पाहा कोणत्या आहेत या पाच गोष्टी आणि काय घेता येईल काळजी. 

Updated: Oct 13, 2022, 03:47 PM IST
Smartphone Tips : स्मार्टफोनच्या खराब बॅटरीमुळे हैराण आहात? अशा प्रकारे वाढवा बॅटरीचं आयुष्य title=

Smartphone Tips :  नवा स्मार्टफोन असो किंवा जुना स्मार्टफोन असो बॅटरी शिवाय स्मार्टफोन काहीही कामाचा नाही. आपल्यापैकी अनेकजण हे स्मार्टफोन लवकर खराब किंवा हँग होत असल्याने त्रस्त असतात. तुम्हीही स्मार्टफोनच्या बॅटरीला त्रस्त झाला असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे स्मार्टफोनची बॅटरी लवकर खराब होते.तर दुसरीकडे काही ट्रिक्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी (Battery) लाइफ सुधारू शकता.. पाहूयात कुठल्या आहेत या गोष्टी...

आजकाल स्मार्टफोनमध्ये जास्त रिफ्रेश रेट (Refresh rate) असलेले डिस्प्ले येऊ लागले आहेत. फोनचा रिफ्रेश रेट जितका जास्त असेल तितका बॅटरीचा वापर जास्त असेल.

तुम्ही फोनच्या रेटिंगवर जाऊन रिफ्रेश रेट ऑटोवर सेट करू शकता. यामुळे फोनच्या गरजेनुसार डिस्प्ले 60Hz किंवा 90Hz वर सेट होईल. यामुळे फोनच्या बॅटरीचे आयुष्य लक्षणीय वाढ होईल.

रिफ्रेश रेटसह तुम्ही डिस्प्लेला ऑटो ब्राइटनेस (brightness) मोडवर देखील सेट करू शकता. जास्त ब्राइटनेस देखील तुमच्या फोनची बॅटरी लवकर काढून टाकते. तुम्ही फोनचा ब्राइटनेस 50 टक्के किंवा त्यापेक्षा कमी ठेवण्याचा प्रयत्न करा किंवा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तो ऑटो-ब्राइटनेस मोडवर सेट करा, यामुळे तुमच्या फोनची अधिक बॅटरी वाचते.

वाचा : तुम्ही वापरत असलेल्या Thumbs-up Emoji चा खरा अर्थ माहितीये का? जाणून व्हाल थक्क

फोनची बॅटरी वाचवण्यासाठी तुम्ही फोनमधील अनावश्यक नोटिफिकेशन्सही बंद करू शकता. गरज नसताना तुम्ही GPS स्थान आणि ब्लूटूथ देखील बंद करू शकता. यामुळे तुमची बॅटरीही वाचू शकते.

तुमच्या फोनची अॅप्स आणि ऑपरेटिंग सिस्टम वेळोवेळी अपडेट करत रहा.अप टू डेट राहिल्याने फोन स्मूथ काम करतो आणि बॅटरीही कमी लागते. यासाठी आठवड्यातून एकदा किंवा दोन आठवड्यांतून एकदा तुम्ही अॅप आणि फोनचे सर्व आवश्यक अपडेट्स चेक करून अपडेट केले पाहिजेत. या पार्श्वभूमी अॅप देखील बंद करा.