तुमचं Facebook अकाऊंट धोक्यात! एका झटक्यात होऊ शकतं असं Hack

गेल्या काही दिवसांमध्ये फेसबुकवर हॅकिंगचं प्रमाण वाढलं आहे. अकाऊंट हॅक करून पैसे मागितले जाण्याच्या घटना समोर आल्या होता. 

Updated: Feb 28, 2022, 01:35 PM IST
तुमचं Facebook अकाऊंट धोक्यात! एका झटक्यात होऊ शकतं असं Hack title=

मुंबई : सोशल मीडियाचा जेवढा उपयोग आहे तेवढंच ते दिवसेंदिवस आपल्या आयुष्यासाठी हानीकारक देखील ठरत आहे. सोशल मीडियावरून फसवणूक होण्याचं प्रमाण वाढत आहे. याच सगळ्यात तुमचं फेसबुक, जीमेल सारखं अकाऊंट सुरक्षित ठेवणं हे एक मोठं आव्हान आहे. 

गेल्या काही दिवसांमध्ये फेसबुकवर हॅकिंगचं प्रमाण वाढलं आहे. अकाऊंट हॅक करून पैसे मागितले जाण्याच्या घटना समोर आल्या होता. आता हॅकर्स आणि व्हायरसचा धोका आहे. आता नवीन व्हायरसद्वारे हॅकर्स तुमच्या खात्यावर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे तुमचे सर्व डिटेल्स हॅकर्सपर्यंत पोहोचू शकतात. 

हा व्हायरस तुमच्यासा सोशल मीडिया अकाऊंटसाठी धोक्याचा 

चेक पॉइंट रिसर्चच्या एका अहवालानुसार नवीन मालवेअर इलेक्ट्रॉन बॉट व्हायरस आला आहे. हा व्हायरस सोशल मीडिया अकाऊंटवर वाईट परिणाम करू शकतो. केवळ फेसबुकच नाही तर गुगल आणि इतर सोशल मीडिया खात्यावरही हा हल्ला करू शकतो. 5 हजारहून अधिक सोशल मीडिया अकाऊंटवर हॅक करण्यात आले आहेत. 

कसं काम करतो मालवेअर

हा व्हायरस तुमच्या फोनमध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरुपात घुसण्याचा प्रयत्न करतो. दुसऱ्या अॅपचा आधार घेऊन तुमच्या अकाऊंटचा अॅक्सीस मिळवतात. Temple Run आणि  Subway Surfers सारख्या गेमिंग अॅपचा आधार हे व्हायरस घेतात. त्याचा आधार घेऊन सोशल मीडिया अकाऊंट हॅक केले जातात. 

हॅकर्स गेम्स अॅपचं क्लोन करतात ज्यामुळे युजर्सपर्यंत पोहोचणं त्यांना सोपं होतं. काही वेळा एखादी लिंक किंवा फोटोद्वारे देखील हॅकर्स तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. इलेक्ट्रॉन बॉटने तुमच्या सिस्टिमला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतं. गुगल आणि फेसबुकचे सर्व अॅक्सिस आपल्याकडे मिळवून स्वत: कंट्रोल करतं. 

वापरा ही ट्रिक

सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या फोनच्या सोशल मीडिया अकाऊंटचे सर्व पासवर्ड सारखे बदलत राहा. चुकूनही थर्ड पार्टी अॅप डाऊनलोड करू नका. थर्ड पार्टी अॅप डाऊनलोड केल्यानंतर त्याला सर्व अॅक्सीस देऊ नका ज्यामुळे तुमचं अकाऊंट हॅक होते.